computer

टेक एक्सपर्ट सुब्रमण्यम यांनी चांद्रयान-२ बद्दल कोणता महत्त्वाचा दावा केला आहे पाहा !!

चेन्नईतल्या एक टेक एक्सपर्ट असलेल्या षण्मुगा सुब्रमण्यम यांनी दावा केला आहे की इस्रोचे चांद्रयान २ चे रोव्हर चंद्रावर अजूनही सुस्थितीत आहे. एवढेच नाही, तर ते काही मीटर पुढे सुद्धा सरकले आहे. यासाठी त्यांनी नासाच्या फोटोंचा दाखला दिला आहे.

चांद्रयान २ भारताचे चंद्रावरचे दुसरे मिशन होते. मागच्या वर्षी पूर्ण देशाचे लक्ष या मोहिमेवर केंद्रित झाले होते. मोहीम पूर्णतः यशस्वी झाली नसली तरी भारतानं जे साध्य केलं होतं, ते अभूतपूर्व होतं. भारतीयांना त्या मोहिमेचा अभिमान होता आणि सर्वांनी तो व्यक्तही केला होता. या मोहिमेत विक्रम लँडर आणि प्रज्ञान नावाचे दोन रोव्हर होते. टेक एक्सपर्ट षण्मुगा यांनी काही ट्विट्स करत दावा केला आहे की प्रज्ञान तिथे आहे, आणि ते विक्रम लँडरपेक्षा थोडं पुढे सरकले आहे.

षण्मुगा यांनी याआधी नासाच्या फोटोंच्या आधारे विक्रम लँडरची ओळख सांगितली होती. यावेळीही त्यांनी आपल्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी नासाच्याच फोटोंचा वापर केला आहे.

षण्मुगा यांच्या म्हणण्यानुसार रोव्हरचा शोध लावणे कठीण होते. कारण ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर होते. चंद्राचा दक्षिण ध्रुव खूप कमी वेळा प्रकाशित असतो. यामुळेच ११ नोव्हेंबरच्या नासाचा उपग्रह चंद्राच्या खूप जवळून गेला, पण तो भाग तेव्हा खूप अंधारात असल्यानं ते प्रज्ञान दिसलं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

पुढे ते ट्विट करताना म्हणतात की, "असे वाटते की विक्रम लँडरला दोन दिवस कमांड्स पाठविण्यात आल्या. अशी शक्यता आहे की लँडरला कमांड्स मिळाल्या असतील आणि त्याने रोव्हर पाठवले असेल. पण लँडर पृथ्वीशी संपर्क करण्यात (कदाचित) असमर्थ असेल."

वैज्ञानिकांचा चांद्रभूमीवर २ मिनिट आधी विक्रम लँडर सोबतचा संपर्क तुटला होता. प्रज्ञानकडून चांद्रयानच्या चौकशीची अपेक्षा होती. या नव्या शोधानुसार प्रज्ञान तिथे असेल तर मोहीम १००% यशस्वी न झाल्याचं दुःख आणखी कमी होईल!

सबस्क्राईब करा

* indicates required