computer

या चिमुकल्या जीवांचा गुन्हा होता तरी काय ?

युद्ध, रोगराई किंवा नैसर्गिक आपत्ती संकट कोणतंही असलं तरी त्याचा पहिला बळी असतो लहान मुलं. युद्धात मारले गेलेल्याच्या संख्येत जश्या स्त्रिया असतात तसेच त्याच संख्येने मुलंही असतात. मंडळी आज याची आठवण काढण्याचं कारण म्हणजे रोहिंग्या मुस्लिमांच्या निर्वासित कॅम्प मधील एका लहानग्याचा झालेला मृत्यू !!

स्रोत

वरील फोटोत दिसणारा मुलगा हा बांगलादेश मधील रोहिंग्या मुसलमानांच्या निर्वासित कॅम्प मधला आहे. ‘अब्दुल अझीज’ असं या मुलाचं नाव. तो ११ वर्षांचा होता. आश्चर्य म्हणजे ताप आणि खोकला सारख्या साध्या आजाराने त्याचा मृत्यू झाला. तो दहा दिवसापासून आजाराने ग्रस्त होता पण वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्याला जीव गमवावा लागला आहे. अश्यावेळी प्रश्न पडतो की मोठ्यांच्या भांडणात या मुलाचा काय दोष होता ?

मंडळी, अश्या संकटात बळी पडलेल्या मुलाचं हे ताजं उदाहरण आहे पण याआधी सुद्धा अनेकदा अश्या घटना घडल्या आहेत. याचीच काही उदाहरणं आपण पाहूयात !!

१. कुपोषित मुलगी आणि गिधाड

आफ्रिकेतल्या सुदान मध्ये भुकेने अनेकांचा जीव घेतला. अनेक मुलं कुपोषित होऊन मेली. त्यांच्यासाठी मदत म्हणून अन्नाची व्यवस्था करण्यात आली होती. हे अन्न जिथे मिळत होतं तिथपर्यंत जायचे त्राण सुद्धा अनेकांच्या शरीरात नव्हते आणि या माणसांपैकी एक म्हणजे या फोटोत दिसणारी लहान मुलगी. ती अन्नासाठी चालत जात असताना मध्येच कोसळली आणि त्याचवेळी एक गिधाड येऊन तिच्या मागे बसलं. हे गिधाड तिच्याच मृत्यूची वाट बघत आहे.

केविन कार्टर या फोटोग्राफरने हा क्षण टिपला आहे.  त्याने सुदान मध्ये १९९३ साली हा फोटो काढला आणि पुढे २६ मार्च, १९९३ च्या न्यूयॉर्क टाईम्स मध्ये हा फोटो झळकला. यानंतर लोकांनी अनेक प्रश्न विचारले. केविन वर आरोप झाला की त्याने या मुलीचा उपयोग फक्त फोटो काढण्यासाठी करून घेतला आणि तिला मदत केली नाही. लोकांच्या प्रश्नाचा भडीमार होऊन केविनने शेवटी आत्महत्या केली.

२. सिरीयन मुलगा

अंगावर काटा आणणारा हा फोटो सिरीयाच्या समुद्र किनाऱ्यावरचा आहे. या फोटोने जगात खळबळ माजली. सिरीया मधली गोंधळाच्या परिस्थितीत किती विकोपाला गेली आहे हेच यातून दिसलं.

सिरियाच्या यादवी युद्धातून बचावण्यासाठी अनेकांनी युरोपचा मार्ग धरला. अशीच एक नौका ग्रीसला जाण्यासाठी निघाली असता ती बुडाली आणि माणसाचा जीव गेला. यात या लहानग्याचा समावेश होता. समुद्रकिनाऱ्यावरचा त्याचा फोटो जगभरात गाजला.

३. भोपाल गॅस ट्रॅजेडी

१९८४ च्या डिसेंबर च्या २ व ३ तारखेला भोपाल मध्ये विषारी गॅसमुळे अनेकजण मरण पावले. याची भीषणता दाखवणारा एकफोटो त्यावेळी प्रसिद्ध झाला होता. 'रघु राय' यांनी हा फोटो घेतला होता. भोपालच्या दुर्घटनेत बळी पडलेल्या मुलाच्या अंत्यविधीचा हा फोटो आहे.

 

या चित्रांनी मन सुन्न होते !!

सबस्क्राईब करा

* indicates required