त्याने प्रपोज करताना मुलीला तब्बल २५ आयफोन्स दिले, पण या आयफोन्सचं पुढे काय झालं ?

मंडळी, लग्नाआधी एक सोहळा येतो ज्या दिवशी मुलगा मुलीला ‘प्रपोज’ करणार असतो. हा दिवस दोघांसाठी भलताच स्पेशल असतो. चीन मधल्या एका मुलाने आपल्या या स्पेशल दिवसाला अजून स्पेशल करण्यासाठी दांडगा खर्च केलाय राव. त्याने त्याच्या होणाऱ्या गर्लफ्रेंडला चक्क २५ ‘iPhoneX’ गिफ्ट केलेत.


स्रोत

झालं असं की, ‘चेन मिंग’ नावाच्या मुलाने ‘ली’ नावाच्या मुलीला प्रपोज करायचं ठरवलं. आता या दोघांच्या आवडीची गोष्ट म्हणजे गेम्स आणि स्मार्टफोन्स. चेन मिंगने हाच विचार करून ली साठी तब्बल २५ iPhoneX विकत घेतले. प्रपोज करताना त्याने गुलाब पाकळ्यांच्या बिछायतीवर हृदयाच्या आकारात त्यांना सजवले. त्याच्या मित्रांनी तिला प्रपोज करण्याच्या ठिकाणापर्यंत आणण्यासाठी मदत केली.


स्रोत


स्रोत

चेन मिंग ने ही सगळी तयारी करून तिला प्रपोज केलं आणि सुदैवाने ती ‘हो’ म्हणाली. नाही म्हणाली असती तर एवढा खर्च केला त्याचं काय झालं असतं राव ?. असो...आता प्रश्न पडेल की नेमके २५ आयफोन का ? तर ली चं वय २५ असल्याने त्याने २५ हा आकडा निवडला. मंडळी, याला म्हणतात स्मार्ट.

आता  खरा प्रश्न उरतो तो म्हणजे ती मुलगी २५ आयफोन्सचं करणार काय ? तर, दोघांनी मिळून हे आयफोन्स आपल्या मित्रांना गिफ्ट केले ज्यांनी या कामात त्यांना मदत केली. हे मित्र सुद्धा कसले लकी आहेत...नाय का ?


स्रोत

मंडळी याला जगातील सर्वात महागडा प्रपोज सोहळा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण याचा खर्च २० लाख ६२ हजार 500 इतका झाला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required