जगातल्या सर्वात थंड गावातलं आयुष्य हे असं आहे! फोटो पाहून जाग्यावर गारठाल!

मंडळी, आपल्याकडे हिवाळ्यात तापमान १२° ते १५° सेल्सिअसपर्यंत उतरलं तरी थंडीने गारठून आपली दातखीळ बसायला लागते. पण तुम्हाला माहित आहे? या जगात अशीही काही ठिकाणं आहेत जिथलं तापमान  इतकं खाली उतरतं की आपण त्याचा विचारही करू शकणार नाही. पण तरीही त्याठिकाणी मानवी जीवन अस्तित्वात आहे.

विचार करा एखाद्या ठिकाणी -६२° अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली उतरलं तर? फक्त आकडा ऐकूनच हुडहुडी भरतीय ना? रशियाच्या सैबेरीया भागातलं हे गाव पहा. या गावचं नाव आहे ओयमाकॉन (Oymyakon). ५०० लोकांची वस्ती असणारं हे गाव पृथ्वीवरील सर्वात थंड गाव म्हणून ओळखलं जातं. आतापर्यंत इथलं तापमान -५२° सेल्सिअस असायचं जे या आठवड्यात -६२° सेल्सिअस पर्यंत उतरलंय.

स्त्रोत

स्त्रोत

रशियाची राजधानी मॉस्कोपासून पुर्वेकडे ३००० मैल अंतरावर हे गाव आहे. विशेष म्हणजे 'ओयमाकॉन' या शब्दाचा अर्थ होतो - अशी जागा जिथं पाणी गोठत नाही. पण इथंतर पाणीच काय, माणसाची हाडेही गोठतील.

स्त्रोत

स्त्रोत

इथलं सर्वात कमी तापमान - ७१.२° सेल्सिअस इतकं नोंदलं गेलंय. गावातील लोकांना क्वचितच सूर्यदर्शन होतं. आणि झालं तरी सुर्याची उष्णता जाणवतच नाही.

स्त्रोत

स्त्रोत

या गावात फक्त एक दुकान असून एक शाळाही आहे.  ही शाळासुद्धा तापमान - ५२° सेल्सिअसच्याही खाली गेलं तरच बंद केली जाते. 

स्त्रोत

स्त्रोत

इथं घराबाहेर पडणार्‍यांच्या डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात. त्यामुळं पाणी मिळण्याची शक्यता तर खूपच दूर. कारण वर उधळलेलं पाणीही इथं खाली येईपर्यंत गोठलेलं असतं!

स्त्रोत

स्त्रोत

अशा परिस्थितीतही हे लोक इथं तग धरून आहेत. हे मात्र विशेष!

सबस्क्राईब करा

* indicates required