'पुनर्जन्म २०२०': सहभागी व्हा 'पुनर्जन्म २०२०' या उपक्रमात !!

'पुनर्जन्म २०२०'
आज सुधीर मोघे यांच्या 'एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी' या कवितेची राहून राहून आठवण होते आहे. 
ही कविता आपल्या सगळ्यांच्या मनःस्थितीची ग्वाही देते. जे मुक्त आणि स्वतंत्र असताना सापडले नाही ते गेल्या काही महिन्यांच्या बंदिवासात गवसले आहे याची प्रचिती आपल्या सगळ्यांनाच आता आली आहे. या दरम्यान आपण बदललो हे आता सगळेच मान्य करतील. 

आपल्या जाणिवा बदलल्या, संवेदनांना उत्तर देण्याची शैली बदलली, विचारांच्या दिशा बदलल्या. काही हट्ट विसरलो, काही अढ्या मावळल्या. चष्म्याच्या काचेवर साठलेली धूळ पुसल्यावर जुने जग नव्याने न्याहाळण्याचा नवा अनुभव येतो तसे हे बदल आपल्यात झाले आहेत. 

एका दृष्टीने आपला पुन्हा एकदा जन्म झाला आहे.
या पुनर्जन्मानंतरचे आयुष्य जगताना या बदलांची भूमिका महत्वाची असेल. तर यानंतरचे आपले आयुष्य कसे कसे असेल याबद्दल बरेच विचार मनात जमा झाले असतील. हे विचार लेखाद्वारे प्रकट करण्याचा तुमचा मनोदय असेल तर 'श्री दीपलक्ष्मी आणि बोभाटा' आयोजित 'पुनर्जन्म २०२०' स्पर्धेत भाग घ्या असा आमचा आग्रह आहे. 

अर्थात स्पर्धा या शब्दाला दुसरा पर्यायवाचक शब्द उपलब्ध नाही म्हणून वापरला आहे. कारण या कालखंडात बर्‍याचजणांनी स्पर्धा हा आपल्या उर्वरीत आयुष्याचा भाग नाही हे मनोमन निश्चित केले असेल. तरीपण लेखनशैली, शब्दरचना, प्रवाही विचारांची मांडणी या गुणांचे कौतुक म्हणून या उपक्रमाला स्पर्धा म्हणतो आहे.

१ या उपक्रमातील उत्कृष्ट पाच लेखकांना प्रत्येकी रु. २००० किमतीची पुस्तके भेट दिली जातील.
२ हे पाच उत्कृष्ट लेख निवडण्याची अवघड जबाबदारी प्रथितयश लेखक पंकज कुरुलकर आणि मानसी होळेहुन्नूर यांनी स्विकारली आहे.
३ श्री दीपलक्ष्मीच्या दिवाळी अंकात हे पाचही लेख प्रसिध्द करण्यात येतील. सोबत www.bobhata.com या संकेतस्थळावरही प्रकाशित करण्यात येतील.
४ या लेखांचे प्रताधिकार 'श्री दीपलक्ष्मी आणि बोभाटा ' यांचेकडे राहतील.
५ हे लेख पाठवण्याची शेवटची तारीख ३०/०६/२०२० आहे. 
६ शब्दसंख्येची मर्यादा- २५०० शब्द (जास्तीतजास्त)
७ लेख [email protected] आणि [email protected] या पत्त्यावर पाठवावेत.
८ वि.सू.- इतरत्र पाठवलेले, पूर्वप्रसिध्द किंवा इतर स्पर्धेत पाठवलेले लेख पाठवू नयेत.
९ काही शंका किंवा प्रश्न असतील तर हेमंत रायकर -९८६७१२६१९६ रामदास- ८७७९६९७९७० यांना संपर्क करावा. 
१० या उपक्रमाचे सर्व निर्णय 'श्री दीपलक्ष्मी आणि बोभाटा' यांचे असतील

चला, तर लिहा आणि सहभागी व्हा 'पुनर्जन्म २०२०' या उपक्रमात!!

सबस्क्राईब करा

* indicates required