अतुलनीय भारत: करवा चौथसाठी इंटरनॅशनल क्रिकेट मॅच पुढे ढकलली?

आपल्या या महान देशात काहीही होऊ शकतं.  तसेही आपल्या संस्कृतीत सणवार, उपासतापास यांची काही कमी नाही. हे सणसमारंभ नसते तर सगळ्या सास-बहू मालिकांत किती प्रॉब्लेम आले असते ना?  असो. आजचा प्रॉब्लेम वेगळा आहे. आपल्या एका सणानं चक्क इंटरनॅशनल क्रिकेटवरच घाला घातलाय.   येत्या ऑक्टोबरमध्ये भारत आणि न्यूझिलंड यांच्यामध्ये होणारी मॅच ठरलेल्या दिवसापेक्षा एक दिवस पुढे ढकलण्यात आलीय.

या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये  भारत आणि न्यूझिलंड यांच्यामध्ये तीन दिवसांची वन डे क्रिकेट मालिका होणार आहे. त्यातली तिसरी मॅच होणार होती १९ ऑक्टोबरला. नेमकी त्याच दिवशी आहे करवा चौथ. मग दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघानं बीसीसीआयचे सेक्रेटरी अजय शिर्केंना मॅच पुढं ढकलण्याची विनंती करणारी पत्रं लिहिली. नाहीतर त्या दिवशी तिकिटांची विक्रीच होणार नाही असं दिल्ली क्रिकेट असोसिएशनचं म्हणणं आहे. 

बीसीसीआयनं ही विनंती मान्य केल्याचं पत्र दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनला मिळालंय.  आजवर फक्त हिंदी मालिकांत करवा चौथचं महत्व पाहिलं असेल,  पण कधी वाटलं होतं की हा सण इंटरनॅशनल क्रिकेटच्या मॅचेस पण हलवू शकेल म्हणून?

नेहमीच सगळ्या गोष्टींची रेवडी उडवणार्‍या नेटकरांना खिल्ली उडवायला एक नवीन विषय मिळालाय.  आज ट्विटरवर एक चक्कर माराच. 

सबस्क्राईब करा

* indicates required