'निसर्ग' वादळाचा सामना करण्याच्या महत्त्वाच्या टिप्स. स्वतः अंमलात आणा आणि इतरांनाही कळवा.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार निसर्ग नावाचे चक्रीवादळ महाराष्ट्रात कधीही येऊ शकते. अशा परिस्थितीत काय करायला हवे आणि काय टाळायला हवे याची माहिती खाली देत आहोत.
वादळ यायच्या आधी
1. कुठल्याही अफवांना बळी पडू नका. शांत राहा.
2. मोबाईल, पॉवरबँक, लॅपटॉप चार्ज करून ठेवा कदाचित वीज पुरवठा खंडित होऊ शकतो.
3. अधिकृत माहितीवर लक्ष ठेऊन राहा, फॉरवर्ड्स दुर्लक्षित करा.
4. सगळी कामाची कागदपत्रे वाटरप्रूफ आणि सुरक्षित जागी ठेवा.
5. अडचणीची परिस्थिती उदभवल्यास तयारी म्हणून इमर्जन्सी किट सोबत असूद्या.
6. घरातील दरवाजे, खिडक्यासारख्या काही गोष्टी मोडकळीस आल्या असतील तर दुरुस्त करून घ्या. कमकुवत गोष्टी अशावेळी तुटण्याची धोका जास्त असतो.
7. घरातले पाळीव प्राणी सुरक्षित ठिकाणी न्या. किमान त्यांना बांधून ठेवू नका. आपत्कालीन परिस्थितीत जनावरे कदाचित आपला जीव वाचवू शकतील.
वादळाची परिस्थिती असल्यास
1. इलेक्ट्रिक साधने, गॅस कनेक्शन बंद करा.
2. दरवाजे आणि खिडक्या बंद असू द्या.
3. जर घरात राहणे सुरक्षित नसेल तर लवकरात लवकर योग्य ठिकाणी पोहोचा.
4. गरम पाणी प्या.
5. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा.
6. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या बिल्डिंग्जपासून दूर रहा.
7. बाल्कनीत ठेवलेल्या वस्तु घरात घ्या. टांगलेल्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फुलांच्या कुंड्या असे काही जे असेल ते बाल्कनीतून काढा.
8. मोटर सायकल मेन स्टँडवर लावा म्हणजे त्या शेजारच्या कारवर पडणार नाहीत.
9. फिल्टर आताच भरून ठेवा. वीज जाण्याची शक्यता आहे.
10. बाल्कनीतील डिशची छत्री, एसीचा कॉम्प्रेसर वगैरेंसारख्या गोष्टी फिट आहे का बघून घ्या.
वादळी परिस्थिती असल्याने घरातच राहून प्रशासनास सहकार्य करा. स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या.
उदय पाटील