तुम्ही हे केलं नाहीत तर तुमच्या घरातला गुप्त खजिना ५ डिसेंबर नंतर कवडीमोल होईल !!

Deadline to dematerialise physical shares is Dec 5 - सर्वसामान्य माणसांच्या नजरेस पडून त्यांना वाचावीशी वाटेल अशी ही बातमी नक्कीच नाही.  पण आपल्यापैकी अनेकांच्या घरातला एक गुप्त खजिना ५ डिसेंबरनंतर मातीमोल होणार आहे. हे कसं? तेच आम्ही तुम्हाला आज समजावून सांगणार आहोत. पण त्याआधी सगळं नीट समजावून घेऊयात.

ही बातमी वाचल्यावर मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे -  Dematerialise Physical Shares म्हणजे काय ?

शेअरबाजारावर सेबी या  सरकारी संस्थेचं नियंत्रण असतं. तर्, सेबीच्या आदेशानुसार  कागदाच्या स्वरुपात असलेले सगळे शेअर या वर्षीच्या ५ डिसेंबर पूर्वी डी-मटेरीयलाइज म्हणजे डीमॅट करणे सक्तीचं झालं आहे. जर तारीख चुकली, तर हे सर्व शेअर्स कवडीमोल होणार आहेत. यापूर्वी १९९६ च्या डीमॅट कायद्यानुसार शेअर्स डीमॅट करायचे किंवा नाही हे गुंतवणूकदाराच्या मर्जीनुसार करायचे काम होते. शहाण्या गुंतवणूकदारांनी आणि शेअरबाजारात नेहमी खरेदी विक्री करणार्‍यांनी शेअर्स डीमॅट केले. बाकीच्या गुंतवणूकदारांचे शेअर्स कागदाच्या स्वरुपातच राहिले. आता मात्र ५ डिसेंबरपूर्वी कागदाच्या स्वरुपात असलेले शेअर डीमॅट करायलाच हवेत.
 
पण डीमॅट करायचे म्हणजे नक्की काय करायचे ?

आपण बँकेत  रोख पैसे  भरले की काय होतं?  हातातलं कागदी चलन बँकेत जमा होतं आणि ते पैसे जमा असल्याची नोंद पासबुकात होते. तसंच डीमॅट करायचं असेल तर काही निवडक, अधिकृत संस्था आहेत त्यांच्याकडं खातं उघडायचं, त्यात शेअर्स जमा करायचे आणि तुमच्या खात्यात त्याची नोंद करून घ्यायची. जेव्हा ते शेअर्स विकायचे असतील, तेव्हा एक फॉर्म भरून ते ब्रोकरकडे द्यायचे आणि विकून टाकायचे.

हे  डिमॅट खातं उघडायचे कसं?

१ ) सीडीएसएल  Central Depository Service Ltd. - CDSL - किंवा
२ )National Securities Depository Ltd. - NSDL इथं खातं उघडता येईल. 

पण त्यापेक्षा सोपा मार्ग आहे की  कोणत्याही ब्रोकरच्या ऑफीसमध्ये जा आणि हे खाते उघडून घ्या. 

खातं उघडल्यावर त्यात ताबडतोब शेअर जमा करता येतील का ? 

नाही. तुमच्याकडे ज्या कंपनीचे शेअर्स असतील, त्या कंपनीच्या रजिस्टर्ड शेअर ट्रान्सफर एजंटकडे शेअर सर्टिफिकेट जमा करावे लागेल आणि पावती घ्यावी लगेल. ते शेअर जमा करून झाल्यावर काही दिवसात ते डीमॅट केल्याची नोंद तुमच्या खात्यात होईल.  

पण हे आम्ही का करायचे ?

बरेचसे गुंतवणूकदार आर्थिक साक्षर नसतात आणि काही अनंत कारणांनी डीव्हीडंड चेक ते खात्यात जमा करता नाहीत. अशा निद्रिस्त लोकांचे शेअर्स घपला करून विकले जाण्याचे फ्रॉड दिवसेंदिवस वाढत जात आहेत. या घोटाळ्यांना आळा घालावा हा या मागचा उद्देश आहे.

शोधायचे कुठे हे शेअर्स ? 

हा एक मोठ्ठा प्रश्न आहे याची उत्तरं अनेक आहेत.  ती  पुढच्या भागात वाचा. 

सबस्क्राईब करा

* indicates required