सावधान...या नंबर वरून फोन आला तर उचलू नका राव !!

मंडळी, केरळ मध्ये +४ आणि +५ क्रमांकापासून सुरु होणाऱ्या फोन क्रमांकावरून लोकांना फोन येत आहेत. हे फोन कुठून येत आहेत याबद्दल अजून माहिती मिळू शकलेली नाही. पण केरळ पोलिसांनी या फोन क्रमांकावरून फोन आल्यास उचलू नका असं आवाहन केलं आहे.

मंडळी, केरळ पोलिसांकडे काही लोकांनी तक्रारी केल्या होत्या. +४ किंवा +५ सुरु होणाऱ्या अज्ञात क्रमांकावरून त्यांना फोन येत होते. याच नंबरवर पुन्हा मिसकॉल किंवा फोन केल्यास फोनचा बॅलेन्स कमी होत असल्याचं आढळून आलं.

सध्या तरी हे अज्ञात नंबर बोलिव्हियाचे असल्याचे म्हटलं जातंय. कारण +५ हा बोलिव्हियाचा आयएसडी कोड आहे. एक खास सायबर सेल याचा तपास घेत असून लोकांनी अशा नंबरवरून फोन आला तर उचलू नये असा इशारा देण्यात आलाय.

स्रोत

राव, काही वर्षांपूर्वीपर्यंत याच प्रकारचे फोन +९२ पासून सुरु होणाऱ्या क्रमांकांवरून येत होते. +९२ हा पाकिस्तानचा आयएसडी कोड असल्याने हे प्रकार दहशतवाद्यांशी जोडलं गेलं होतं.

असं म्हणतात की हे अनोळखी नंबरचं झांगाट मोबाईल कंपन्यांनीच सुरु केलेलं आहे. ४+ किंवा +५ क्रमांकापासून सुरु होणारे नंबर स्पेशल असतात. त्यावर फोन केल्यास ५० रुपयांपर्यंतचा बॅलेन्स जातो. अर्थातच हे पैसे मोबाईल कंपन्यांच्या खिशात जातात त्यामुळे हे राजरोसपणे सुरु असतं.

यावर उपाय काय ?

फोन करणारे कंप्युटरवर स्क्रिप्ट लिहून रँडम नंबरांवर फोन करतात. म्हणजेच कंप्युटर हे फोन करतो. जे फोन लागत नाहीत, ते यादीतून काढून टाकले जातात आणि जे लागतात, त्यांना पुन्हापुन्हा मिस्ड कॉल दिला जातो. तुम्ही एक नंबर डिलीट केलात, तर तुम्हाला दुसऱ्या नंबरवरून फोन येतो. त्यामुळं नंबर ब्लॉक करण्याऐवजी थेट सिरीज ब्लॉक करणं फायद्याचं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required