दुबईच्या वाळवंटात मुसळधार पाऊस पडतोय...व्हिडीओ पाहिला का?

कृत्रिम पावसाबद्दल तुम्ही ऐकले असेल. भारतात जेव्हा पाऊस पडत नाही, तेव्हा बऱ्याचवेळा कृत्रिम पावसाच्या चर्चा कानावर येत असतात. दुबईत सुद्धा कृत्रिम पाऊस पाडण्यात आला आहे. पण त्यांची कारणे थोडी वेगळी आहेत.
संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएई तिथल्या उष्ण हवामानासाठी प्रसिद्ध आहे. सध्या तर तिथे ५० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान गेले आहे. यावरच उतारा म्हणून हा कृत्रिम पावसाचा घाट तिथे घालण्यात आला आहे. जिथे प्रचंड गरम होत होते. तेथील रस्ते पावसाने भिजलेले बघून लोकांना सुद्धा आश्चर्य वाटत आहे. यूएई येथील राष्ट्रीय हवामान विज्ञान केंद्राने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहा.
दुबईच्या रस्त्यांवर दिसत असलेला पाऊस बघून कुणालाही वाटेल की हे दुबई नाहीतर दुसरेच कुठले ठिकाण आहे. ड्रोनच्या माध्यमातून हा पाऊस पाडण्यात आला. याला क्लाउड सिडिंग असे सुद्धा म्हणतात. या नव्या तंत्रज्ञानाने ढगांना विजेचा झटका दिला जातो. ज्यामुळे ढग एकत्र येऊन पाउस पडतो. हे काम करण्यासाठी ड्रोन वापरले जातात. हे ड्रोन इतर ड्रोन सारखे नसून त्यात एमिशन उपकरण आणि कस्टमाईज सेन्सर आहेत. ड्रोन कमी उंचीवर उडत असताना हवेच्या अणूंना एक विद्युत झटका देतात. परिणामी पाऊस पडण्यास मदत होते.
हा व्हिडीओ बघितल्यावर मात्र भविष्यात जगभरात इतरही दुष्काळी भागात पाऊस पाडता येऊ शकतो याबद्दल आशा निर्माण झाली आहे. या तंत्रज्ञानावर अजूनही संशोधन सुरू असल्याने भविष्यात या तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठी क्रांती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.