डुप्लिकेट डिजिट्ल पेमेंट ॲप्स कशी फसवणूक करतात आणि त्यातून कसे वाचता येऊ शकेल?

डिजिटल क्रांतीने घडवून आणलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे डिजिटल पेमेंटची सुविधा. यामुळे घरबसल्या कित्येक गोष्टी करणे शक्य झाले. बँकांच्या चकरा मारण्याची गरज मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे महत्वाचे म्हणजे सोबत रोकड नसली तरी फोन पे, पे टीएम, गुगल पे सारखे ऍप वापरून पेमेंट करता येते.

डिजिटल युगाची महत्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाइन गोष्ट कुठली असली तर तिचे फायदे जसे मोठे आहेत तसे तोटेही मोठेच आहेत. या ऑनलाइन पेमेंट ऍपच्या माध्यमातून मोठे फ्रॉड होण्याच्या अनेक घटना गेल्याकाही काळात घडल्या आहेत. तुमच्या फोनचा ॲक्सेस मिळवून परस्पर पैसे गायब करणे हे धंदे जोरात सुरू असतात.

आता मात्र नवीनच प्रकार समोर आला आहे. पे टीएमसारख्या ऍपचे जसेच्या तसे डुप्लिकेट ऍप आले आहेत. यात जसे खऱ्या पेटीएम ऍपमध्ये पेमेंट केली जाते तसेच सर्वकाही दिसते. पण पेमेंट काही होत नाही. ज्याला पेमेंट करायचे त्याने जर स्वतःचा मोबाईल चेक केला नाही तर पैसे आले असेच वाटते. असा एक प्रकार रंगेहाथ पकडल्यावर तो व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे. 

 

यात बनावट पेटीएम ऍप वापरून पेमेंट केल्याचे भासवले जाते मात्र प्रत्यक्षात तसे काहीही नसते. लोकांना अनेकवेळा दुकानात ग्राहक जास्त असल्याने ग्राहकाने केलेली पेमेंट स्वतःच्या मोबाईलमध्ये चेक करण्याची सवड नसते म्हणून ते ग्राहकाने पेमेंट झाल्याचे दाखवले तर दुकानदार समाधानी होतात. फक्त पे टीएम नाहीतर गुगल पे, फोन पे यांचेही हे डुप्लिकेट ऍप आहेत. यात होते काय की या डुप्लिकेट ऍपमध्ये सेम इतर पेमेंट ऍपमध्ये दिसते त्याप्रमाणे नाव, नंबर अशी माहिती टाकली जाते. तिथे पेमेंट झाल्याचा स्क्रीनशॉट ही येतो. म्हणजेच पैसे आले हाच भास व्हावा यासाठी सर्व तयारी या डुप्लिकेट ऍपमध्ये असते.

आता यावर उपाय काय असू शकतो? तर सध्या पेटीएमने पैसे आले की नाही हे ओळखण्यासाठी स्पीकर्सची सोय उपलब्ध करून दिली आहे. एखाद्याने पैसे पाठवले तर स्पीकरवर पैसे आले म्हणून आवाजी संदेश येतो. दुकान किंवा इतर शॉप असेल तर हे स्पीकर बसवणे हा सर्वात योग्य उपाय आहे. तसेच दुकानदारानेही अशावेळी या डुप्लिकेट ऍपचा वाढलेला सुळसुळाट पाहता समोरच्या व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये जरी पैसे पाठवल्याचे दाखवले तरी स्वतःच्या मोबाईलमध्ये पैसे आले की नाही हे चेक करून घ्यावे म्हणजे फसवणूक होणार नाही.

यातही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सध्या लोकांना काही गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी स्क्रीप्टेड विडिओ तयार केले जातात.  दुकानातले पेटीएम स्पीकर्स कसे अनिवार्य आहेत हे सांगण्यासाठीही असा व्हिडिओ असू शकतो. आता हा व्हिडिओ तशातला आहे की नाही हे सांगता येणे कठीण असले तरी एक गोष्ट मात्र नक्की की डुप्लिकेट ऍपच्या माध्यमातून फसवणूक होण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत आणि म्हणून प्रत्येकाने या गोष्टींवर उपाय केला पाहिजे. कारण विषय पैशांचा आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required