हे दोघे करतात दोन टोकांचं एडिटिंग!! लै भारी की हसून मुरकुंडी, कोणतं आवडतं तुम्हांला?

सध्या सोशल मीडियावर करण आचार्य नावाचा एक फोटोशॉप करणारा गडी भलताच फेमस झाला आहे. सगळीकडे त्याचे कौतुक होत आहे. तो काय करतो? तर फोटोज भन्नाटपणे एडिट करतो. उदाहरणार्थ, या जोडप्याचा आपल्या बाळासोबतचा फोटो पाहा. फोटोतील जोडप्याचं रुपांतर त्याने यशोदा आणि नंद मध्ये केलं आहे, तर बाळाला चक्क कृष्णाचं रूप दिलंय.

लोकांना हे एडिटेड फोटो जाम आवडत आहेत आणि एकाचा पाहून दुसरेही त्याला त्यांचा फोटो एडिट करण्यासाठी विनंती करतात. करण त्यांचेही फोटो एडिट करून तो एकापेक्षा एक भन्नाट फोटो तयार करून देतो. करणने एडिट केलेले इतके सुंदर असतात की ते सगळीकडे वायरल होतात.

मात्र सगळेच एडिटर्स आपल्या कलेचा एवढा चांगला उपयोग करत नाहीत. जेम्स फ्रीडमन नावाचा एक एडिटर आहे, त्याला जर कुणी फोटो एडिट करायला सांगितले तर तो भलतेच काम करून देतो. पण तरीही तो ही तेवढाच प्रसिद्ध आहे. कारण त्याने एडिट केलेले फोटो हे भयंकर विनोदी असतात.

जेम्सला तुम्ही जर सांगितले की आमच्या मागची भिंत काढून आम्ही गार्डनमध्ये उभे आहोत असा फोटो एडिट कर, तर तो भलत्याच ठिकाणी एडिट करेल आणि तयार झालेला फोटो मात्र विनोदी असेल.

हे पाहा उदाहरणादाखल काही फोटो. ते पाहून नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू तरळल्याशिवाय राहणार नाही. याने चुकून तुमचा फोटो एडिट केला तर काय होईल हा विचार करून बघा एकदा...

 

सबस्क्राईब करा

* indicates required