computer

गुगलचा नवाकोरा पिक्सेल 4A स्मार्टफोन घ्यावा की घेऊ नये?...फोनबद्दल सगळी माहिती जाणून घ्या !!

गुगलने पिक्सल 4A स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन म्हणजे गुगलच्या पिक्सल 3A चे अपडेटेड व्हर्जन आहे. गुगलने हा नविन स्मार्टफोन होल पंच डिझाईनसोबत मार्केटमध्ये आणला आहे. होल पंच डिझाईन म्हणजे जिथे सेल्फी कॅमेऱ्यात फक्त एक पंच होल एवढा डिस्प्ले स्पेस स्क्रीनवर दिलेला असतो. बाकी पूर्ण पॅनल डिस्प्लेसारखे काम करते. यामुळे आपल्याला मोठी स्क्रीन वापरायला मिळते.

या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात टायटन एम सिक्युरिटी मॉडेल आहे. आज आपण गुगलच्या या स्मार्टफोन्सच्या फिचर्सबद्दल जाणून घेणार आहोत.

सॉफ्टवेअर - गुगल पिक्सल 4A स्मार्टफोन अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो. या मोबाईलमध्ये नवा गुगल असिस्टंट दिला गेला आहे. या असिस्टंटच्या मदतीने वेगाने टेक्स्ट मेसेज पाठवणे इत्यादी कामे करता येणार आहेत.

इंग्लिशमध्ये रियल टाईम ट्रान्सस्क्रिप्शन सपोर्ट म्हणजे आपण बोलत असताना बोललेला मजकूर त्वरित स्क्रीनवर दिसणं सहज आणि लगोलग साध्य होणार आहे. सोबत रेकॉर्डर ऍपसुद्धा मिळणार आहे. याव्यतिरिक्त पिक्सेल 4A स्मार्टफोन लाईव्ह कॅप्शन सपोर्ट सोबत येत आहे.

डिस्प्ले - गुगल पिक्सल 4A मध्ये 5.81 इंच फुल एच डी + (1,080 × 2,340 पिक्सल) ओलेड डिस्प्ले आहे. याचा ऍस्पेक्ट रेशो म्हणजे मोबाईलच्या लांबी रुंदीचं गुणोत्तर 19.5:9 आहे आणि पिक्सल डेन्सीटी 443 पिक्सल प्रति इंच आहे. ऑलवेज ऑन डिस्प्ले एचडीआर सपोर्ट करतो.

प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज - स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी क्वालकम स्नॅपड्रॅगन 730 जी ऑक्टा-कोर प्रोसेसर सोबत 6 जीबी LPDDR4x रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवणे शक्य नाहीये.

कनेक्टिव्हिटी - फोनमध्ये 4 जी VOLTE, वायफाय 802. 11 एसी, जीपीएस, ए-जीपीएस, ब्लुटूथ व्हर्जन 5.0, एनएफसी, यूएसबी टाईप सी और 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक दिले गेले आहे. सिक्युरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर फिंगर प्रिंट सेन्सरला जागा मिळाली आहे.

बॅटरी क्षमता - गुगल पिक्सल 4A मध्ये जीव आणण्यासाठी 3140 mah ची बॅटरी दिली गेली आहे. ही 18 वॅट फास्ट चार्ज सपोर्ट करते.

कॅमेरा - कॅमेरा सेटअप पाहायला गेलात तर फोनच्या बॅकपॅनलवर 12 mp प्रायमरी कॅमेरा सेन्सर, अपार्चर एफ/ 1.7 आणि एलईडी फ्लॅश आहे. रियर कॅमेरा ड्युअल एक्सपोजर कंट्रोल, पोर्ट्रेट मोड, टॉप शॉटसोबत एचडीआर सपोर्ट करतो.

फोनमध्ये युजर ऑप्टिकल इमेज स्टेबिलायजेशन सपोर्टसुद्धा मिळेल. त्यामुळे फोटो काढताना हात थरथरला तरी काही अडचण नाही. इमेज स्टेबिलायजेशन फीचर मोबाईलची चुकीच्या ठिकाणी फोटो ब्लर करत असेल तर ते ही दुरूस्त करण्यात मदत करते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 mp चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

डायमेंशन - फोनची लांबी, रुंदी 144 × 69.4×8.2 मिलीमीटर आहे. तर वजन 143 ग्राम आहे.

किंमत - किंमत हा फॅक्टर सर्वात महत्वाचा असतो. गुगलने सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊनच किंमत ठेवली आहे. सध्यातरी हा फोन एकाच कलरमध्ये म्हणजे जेट ब्लॅकमध्ये उपलब्ध आहे. या फोनच्या 6 जीबी रॅम/ 128 जीबी स्टोरेजची किंमत भारतात 26 हजार 300 रुपये ठेवली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required