computer

जाणून घ्या इंटरनेट विश्वातल्या रोचक गोष्टी, ज्या तुम्हाला माहित असायलाच हव्यात...

आज रोजी जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ३ अब्ज ७३ कोटींवर पोहचली आहे. 1G, 2G, 3G, 4G नंतर सर्वत्र आता 5G टेक्नॉलॉजीचं वारं वाहू लागलंय. आपण इंटरनेट शिवाय आपल्या आयुष्याची आता कल्पनाही करू शकणार नाही मंडळी. पण तुम्हाला माहीतीये का? या सगळ्याची सुरूवात कुठून झाली? आज  इंटरनेट जगतावर अधिराज्य गाजवणार्‍या या दादा कंपन्यांचं पहिलं पाऊल कसं होतं? चला तर मग पाहूया... 

पहिला इमेल

जगातला पहिला इमेल १९७१ मध्ये रे टॉमलिन्सन यांनी स्वतःलाच पाठवला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या इमेलमध्ये लक्षात ठेवण्यासारखं काहीही विशेष नव्हतं. तो टेक्स्ट मेसेज त्यांनी QWERTYIOP असा काहीतरी टाईप करून पाठवलेला होता. अमेरिकन कॉम्प्युटर प्रोग्रॅमर असणार्‍या रे यांना इमेलचे जनक म्हणून ओळखलं जातं.

पहिली वेबसाईट

जगातली पहिली वेबसाईट टिम बर्नर्स ली यांनी १९९१ मध्ये बनवली होती. http://info.cern.ch/hypertext/WWW/TheProject.html असा त्या वेबसाईटचा अॅड्रेस होता. टिम बर्नर्स ली हे वर्ल्ड वाईड वेब (WWW) चे जनक आहेत आणि त्यांनीच ही वेबसाईट बनवून त्यावर लोकांसाठी WWW बद्दलची सविस्तर माहिती दिली होती. विशेष म्हणजे जगातला पहिला ब्राऊजरही त्यांनीच बनवला होता ज्याचं नाव होतं- WorldWideWeb. 

पहिलं फेसबुक अकाउंट

फेसबुकवर सर्वात आधी ३ अकाउंट्स तयार करण्यात आली होती आणि फक्त टेस्टींगसाठी वापरली गेली होती.  ती तेव्हाच डिलीट करण्यात आली. त्यानंतरचं चौथं अकाउंट हे खुद्द मार्क झुकरबर्गचं आहे, ज्याला आपणं पहिलंवहिलं फेसबुक अकाउंट म्हणू शकतो. त्यावेळी प्रत्येक अकाउंटला आयडी कोड देण्यात आला होता. झुकरबर्गचं अकाउंट हे चौथं असल्याने आजही त्याच्या अकाउंट URL मध्ये ४ हा अंक आहे. त्यानंतर ५ व ६ नंबरचे अकाउंट हे झुकेरबर्गच्या रुममेट्स आणि फेसबुकच्या सहसंस्थापकांचे आहेत. यानंतर ७ नंबरचं अकाउंट हे Arie Hasit यांनी बनवलं आहे आणि ते फेसबुकच्या टीम बाहेरील फेसबुक अकाउंट उघडणारी पहिली व्यक्ती आहेत.

पहिला युट्यूब व्हीडीओ

जगातला पहिला युट्यूब व्हीडीओ हा जावेद करीम या  युट्यूबच्याच सहसंस्थापकांने अपलोड केला होता. "मी अॅट द झू" असं नाव असलेला हा १९ सेकंदांचा व्हीडीओ २४ एप्रिल २००५ रोजी अपलोड करण्यात आलाय. आजपर्यंत या व्हीडीओला ४ करोड लोकांनी पाहिलंय.

पहिला ट्विट 

जगातला पहिला ट्विट हा ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी २१ मार्च २००६ रोजी केला होता. "just setting up my twttr" असा तो ट्विट होता.

पहिलं डोमेन नेम

जगातलं पहिलं डोमेन नेम Symbolics.com आहे आणि ते १५ मार्च १९८५ रोजी रजिस्टर करण्यात आलं होतं. हे डोमेन नेम Symbolics Inc. नावाच्या कॉम्प्युटर सिस्टम कंपनीकडून नोंदवलं गेलं होतं. आजही तुम्ही या ऐतिहासिक वेबसाईटला भेट देऊ शकता.

स्काईप वरचं पहिलं वाक्य

स्काईपवर एप्रिल २००३ मध्ये इस्टोनीयन भाषेत पहिल्यांदा काही शब्द बोलले गेले होते. स्काईपच्या डेव्हलपमेंट टीमच्या एका सदस्याने उच्चारलेले "हॅलो, तुम्ही मला ऐकू शकता का?" असं ते वाक्य होतं.

सबस्क्राईब करा

* indicates required