जाणून घ्या काय आहे ही चीनमधली अमानुष परंपरा !!!

सौंदर्याच्या व्याख्या या जगभरात माणसांनुसार, संस्कृतीनुसार बदलत जातात. हल्ली स्त्रिया पार्लरमध्ये जाऊन वेळ खर्च करून आपल्याय सौंदर्याची काळजी घेताना दिसतात. पण काही देशांत वेगळीच परिस्थिती आहे. आफ्रिकेसारख्या देशातल्या स्त्रिया शरीरावर गोंदवून आपलं सौंदर्य वाढवतात, म्यानमारमधल्या स्त्रिया आपल्या गळ्याभोवती पितळी तार लपेटून घेतात त्यामुळे त्यांची मान भलतीच उंच दिसते,  तर मॉरिटानियासारख्या देशात लठ्ठपणा हे सौंदर्याचं प्रतिक आहे.

चीनमध्ये अशीच एक डोक्याला शॉट देणारी परंपरा आहे मंडळी. असं म्हणतात माणूस ओळखायचा असेल तर त्याचे पाय बघावेत. चीनची ही पद्धत याच पायांवर अक्षरशः जुलूम वाटेल अशी आहे. या पद्धतीला फुट बाईंडिंग असं म्हटलं जातं.

फुट बाईंडिंग प्रक्रियेत पायाच्या पंजाला काही अश्या प्रकारे वाकवलं जातं की ते अगदी न उमललेल्या कमळाच्या आकाराचे वाटावेत. यामुळे या पद्धतीला ‘लोटस फुट’ असेही म्हटलं जातं.  त्याकाळात चीनमध्ये पायाचा आकार लहान असणे हे एक प्रकारे सौंदर्याचे परिमाणचं होतं.

 

फुट बाईंडिंगची सुरुवात कशी झाली ?

Image result for foot bindingस्रोत

या सर्वांची सुरुवात झाली तांग राजवंशाच्या एका राजा पासून.  जवळजवळ हजार वर्षांपूर्वी. हा राजा एका नर्तकीच्या प्रेमात पडला जी आपला पाय चंद्राच्या आकारात बांधून नाचत असे. असं म्हणतात की बांधल्यामुळे पाय लहान दिसत आणि तिचं नृत्य अधिक खुलत असे. याच नर्तकीने फुट बाईंडिंग परंपरा तांग राजवंशात स्थापन केली.

यात गम्मत अशी की चीन मधल्या उच्चभ्रू घराण्यातल्या महिलांनी फुट बाईंडिंग पद्धतीला उचलून धरलं. खालच्या स्थरातील स्त्रिया ज्या शेतीची कामे, तसेच घरची कामे नेमाने करत त्यांना आपल्या पायाला असा आकार देऊन काम करणे कठीण जात असल्याने तुलनेने कमी काम करणाऱ्या, घरात भरपूर नोकर चाकर असणाऱ्या स्त्रियांमध्ये आपल्या पायाचा आकार लहान करण्याची स्पर्धा सुरु झाली. एकमेकींना पायावरून खिजवणे असले प्रकार इथेही होते. लहान आकाराच्या पायांसाठी वापरण्यात येणारे बूट

त्याच्या राज्यात एक नर्तकीच्या आपला पाय चंद्राच्या आकारात बांधून नाचत असे, आणि हा तिच्या प्रेमात पडला. असं म्हणतात की बांधल्यामुळे पाय लहान दिसत आणि तिचं नृत्य अधिक खुलत असे. याच नर्तकीनं फुट बाईंडिंग परंपरा तांग राजवंशात स्थापन केली.

फुट बाईंडिंगची प्रक्रिया !

Image result for foot bindingस्रोत

लहान वयातचं मुलींच्या पायाला आकार यावा आणि ती जस-जशी मोठी होईल तसा तिचा त्रास कमी व्हावा म्हणून हा प्रकार त्यांच्या लहानपणीच सुरू केला जायचा.  या प्रक्रियेत सर्वात गरम पाण्यात पायांना धुवून घेत. या पाण्यात औषधी वनस्पती आणि प्राण्यांचे रक्त मिसळलेले असायचे. त्यानंतर सर्वात आधी तिच्या अंगठ्याचं हाड मोडून ते वाकवलं जात असे . त्याचबरोबर पायाच्या पुढच्या भागाला तोडून पायाचा आकार कमी केला जायचा. बाकीची बोटे वाकवून त्यांना कायमचं तळव्याला चिकटतील अशी व्यवस्था केली जायची. आत्यंतिक वेदना होत असतानाही याच अवस्थेत मुलीना चालायला लावलं जायचं. सतत चालल्यामुळे काही वर्षात तिला सवय होऊन त्या असह्य वेदना कमी होत असत.

३ इंच पायाचा आकार म्हणजे गोल्डन फिट म्हणून ओळखला जायचा. हा सर्वात आदर्श आकार म्हणून ओळखला जातो. ४ इंचाच्या पायाला सिल्वर फिट म्हटलं जायचं. याखालोखाल ५ इंच च्या पायाला मात्र जराही किंमत नव्हती. 

फुट बाईंडिंगची पद्धत शतकानुशतके सामान्य बाब मानली जात असे. मात्र १९११ साली ही प्रथा संपुष्टात आणली गेली. फुट बाईंडिंगचं समर्थन करताना काही लोकांच असं मत होतं कि यामुळे स्त्रियांच्या सौंदर्यात भर पडते.  तसंच हे एका सुखी संसाराचं प्रतिक आहे असंही म्हणायला ते कमी करत नसत. पण तसं बघायला गेलं तर स्त्रियांवरची पुरुषाची मक्तेदारीच यातून अधिक स्पष्ट होते हेच खरे.

सबस्क्राईब करा

* indicates required