computer

ड्रायवर लोकांना असतात हे ८ गैरसमज...पाहा बरं, तुम्हांला यातल्या किती गोष्टी माहीत होत्या...

आपल्या भारतात अनेक समज गैरसमज जोपासले जातात. भारतीय वाहनचालक सुद्धा वाहनांबाबत असेच मजेशीर गैरसमज बाळगून असतात हे आपण बघितलं आणि अनुभवलंच असेल. वाहनांच्या मायलेज बाबत वाहनचालकांमध्ये किती जागरूकता आहे हे पाहण्यासाठी फोर्ड कंपनीने एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये आशिया खंडातील 11 देशातील 9500 ड्रायव्हर सहभागी झाले होते. त्यात 1,023 ड्रायव्हर्स भारतातील होते. तर बघूया भारतातील ड्रायव्हर्स मायलेज विषयी काय गैरसमज बाळगून असतात…

1. जोरात ऍक्सीलरेटर दाबल्याने मायलेजवर परिणाम होत नाही -

हा असा बऱ्याच जणांचा समज आढळून आला. जो अत्यंत चुकीचा आहे. गाडी जेवढी जोरात पळवली जाते त्या प्रमाणात इंजिनवर ताण वाढतो आणि त्याच वेगाने इंधन सुद्धा वापरले जाते. त्याचा परिणाम मायलेजवर होतो.

2. थांबलेल्या स्थितीत इंजिन चालू ठेवले तर इंधन जळत नाही -

अजून एक मोठा गैरसमज! तुमचा विश्वास बसो वा न बसो, पण 26% ड्रायव्हर्सना वाटते की इंजिन सुरू करून गाडी एका ठिकाणी थांबली असेल तर इंधन वापरले जात नाही. खरी गोष्ट अशी की, 15 सेकंडपेक्षा जास्त काळ थांबायचे असेल तर इंजिन बंद करायला हवे.

3. जीपीएस मुळे इंधनावर परिणाम होत नाही -

आपल्या देशातील फक्त 27% ड्रायव्हर्सना जीपीएस बाबत ज्ञान आहे. बाकीच्यांना जीपीएस म्हणजे एक फॅड वाटते. खरं तर गर्दी आणि ट्रॅफिक जाम टाळून दुसऱ्या मार्गाने जाण्यासाठी जीपीएस फार कामी येते. ट्रॅफिक जाम मध्ये हळू हळू जाण्याने आणि नेहमी ब्रेक दाबण्याने इंधन मोठ्या प्रमाणात जळते.

4. डोंगराळ भागात सुद्धा तेवढेच इंधन लागते जेवढे सपाट रस्त्यांवर लागते -

हा आणखी एक मजेशीर गैरसमज आहे. तब्बल 52% ड्रायव्हर्सना माहीत नाही की डोंगराळ भागातले रस्ते इंधनावर मोठा परिणाम करतात. जेव्हा गाडी उभ्या चढणीवरून जात असते तेव्हा इंजिनला जास्त पॉवर सप्लाय करावी लागते. आणि त्याचा सरळ परिणाम मायलेज वर होतो. कारण जास्त पॉवरसाठी जास्त इंधनाचा वापर असे साधे गणित आहे.

5. वातावरणाचा मायलेजवर परिणाम होत नाही -

वातावरणाचा वाहनावर कसा परिणाम होतो याबाबत 73% ड्रायव्हर अनभिज्ञ आहेत. इंजिन व्यवस्थित चालण्यासाठी त्याला एका विशिष्ट तापमानावर जाण्याची गरज असते. थंडीच्या दिवसात हे तापमान गाठण्यासाठी जास्त वेळ लागतो. हा वेळेचा फरक भरून काढण्यासाठी इंजिनाला जास्त मेहनत घ्यावी लागते आणि परिणामस्वरूप इंधन सुद्धा जास्त प्रमाणात वापरले जाते. या उलट, गर्मीच्या दिवसांमध्ये एसी चालू केल्यासही इंधन नेहमीपेक्षा जास्त वापरले जाते.

6. वजन आणि मायलेजचा संबंध नाही -

65% ड्रायव्हर्सना हे माहीतच नाही की, गाडीतील बिनाकामाच्या जड वस्तू काढल्याने गाडी जास्त मायलेज देते. साधी गोष्ट आहे, जेवढे गाडीमध्ये वजन कमी असेल तेवढा कमी ताण इंजिनवर येईल. काहीजण तर वाट्टेल त्या जड वस्तू गाडीत ठेवून तिला वजनदार बनवतात. मग मायलेज कमी झाले म्हणून तक्रार करतात. नको असलेल्या, बिनमहत्वाच्या वस्तू काढणे हेच उत्तम.

7. नेहमी सर्व्हिसिंग करण्याचा आणि मायलेजचा संबंध नाही -

फारच चुकीचा समज आहे हा. 33% ड्रायव्हर्सना माहीतच नाही की वेळेवर सर्व्हिसिंग केल्याने गाडीचे आरोग्य उत्तम राहते आणि इंजिनाची कार्यक्षमता वाढते. भारतात असे दिसून येते की फक्त एक तृतीयांश गाडी मालक आपल्या गाडीची वेळेवर सर्व्हिसिंग करतात. जर ही साधी पण महत्वाची गोष्ट वेळेवर नाही केली तर गाडीचे मायलेज कमी झाले अशी तक्रार करण्यात काय अर्थ आहे?

8. क्रुझ कंट्रोल मुळे मायलेजवर फरक पडत नाही -

आजकाल बऱ्याच नवीन गाड्यांमध्ये क्रुझ कंट्रोलची सुविधा मिळत आहे. 73% ड्रायव्हर्स या सुविधेचा फक्त एक गरज म्हणून वापर करतात. पण त्यांना माहीतच नाही की क्रुझ कंट्रोल ही अशी एक सेटिंग आहे ज्यात इंजिनमध्ये अतिरिक्त इंधन वापरण्यावर सुद्धा कंट्रोल केला जातो. त्यामुळेच गाडी जेवढी जास्त वेळ क्रुझ कंट्रोल मध्ये असे तेवढेच जास्त मायलेज मिळेल.

 

बोभाटाचीची खास टीप :

तुम्ही डीझेल वापरत असाल किंवा पेट्रोल. यापैकी कुठलेही इंधन वापरणाऱ्या इंजिनची एफिशियन्सी त्यात जमा होणाऱ्या कार्बनच्या कणांमुळे कमी होते. त्यामुळे इंधनाचा काही अंश अर्धवट जाळून धुरावाटे बाहेर पडतो. थोडक्यात तुमचे इंधन वाया जाते. सध्या इंडियन ऑईल (टोटल) किंवा इतर कंपन्या 'Fuel Additive' वापरायचा सल्ला देतात. १ लिटर इंधनामागे फक्त १ml Fuel Additive पुरेसे असते. या १ml मुळे ५ ते ६% इंधनाची बचत होते. थोडा विचार करा जर तुम्ही २०० लिटर इंधन एका महिन्यात वापरात असाल तर तुमच्या वार्षिक बचतीतून तुमच्या गाडीच्या विम्याचा खर्च निघतो. त्याखेरीज मेंटेनन्सचा खर्च कमी होतो, प्रदूषण कमी होते, आणि झालंच तर देशाचे परदेशी चलन पण वाचते.

Fuel Additives बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी श्री प्रसाद ठकार ९९३०७४८९३६ या क्रमांकावर संपर्क करा.  

सबस्क्राईब करा

* indicates required