computer

तेलंगणाच्या वनाधिकाऱ्यांनी नवीन धबधबा शोधलाय? व्हिडीओ पाहून घ्या!!

पावसाळा म्हणलं की धो धो पडणारा पाऊस, हिरवागार निसर्ग आणि उंचच उंच घाटमाथ्यावरून पडणारे धबधबे आठवतात. पावसाळ्यात हे धबधबे पाहणे ही एक पर्वणीच असते.  अशाच एका नवीन धबधब्याचा शोध नुकताच लागला आहे. तेलंगणाच्या आसिफाबादमध्ये वनाधिकाऱ्यांनी हा नवा धबधबा शोधला आहे. या नव्या धबधब्याच्या शोधामुळे पर्यटकांना अजून एक सुंदर पॉईंट बघता येणार आहे.

चला तर सविस्तर जाणून घेऊया.

वनाधिकाऱ्यांनी तेलंगणाच्या आसिफाबादमध्ये सुमारे ६० मीटर वाहणारा धबधबा दिसला. हा धबधबा असिफाबादच्या गिनधारी (Ginnedhari) वनक्षेत्रात आहे. या वनक्षेत्रात अनेक धबधबे आढळतात. तिथल्या लोकप्रिय अशा गुंडाळा धबधब्यापासून सुमारे २ किमी अंतरावर हा नवा धबधबा आहे. याला बायसन असे नाव देण्यात आले आहे. बायसन धबधब्याच्या माथ्याशेजारील एक विशाल खडक पाहून नाव निवडण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्थानिकांना असा धबधबा आहे याची काही माहिती नव्हती.

तेलंगणातील कुमुराम भीम आसिफाबाद जिल्ह्यात गुंडाळा आणि मिट्टे हे लोकप्रिय धबधबे आहेत. हे धबधब्याचे माहेरघर मानले जाते. तिरीनी जंगलात चिंतला मदारा, पिलीगुंडम, चिचारोल्डी आणि इतर अनेक धबधबे आहेत. आता बायसन धबधबा हाही या यादीत नव्याने समाविष्ट होईल. या धबधब्या व्यतिरिक्त येथे एक खोल दरी आहे, जिथून रोप क्लाइंबिंग करता येईल. नैसर्गिक रचनेला धक्का न पोचवता हा भाग विकसित करता येईल का याचा विचार चालू आहे.

थोडिशेट्टी प्रणय व इतर वनपरिक्षेत्र अधिकारी तिथे काही दिवसांपूर्वी फिरत असताना हा नयनरम्य परिसर त्यांच्या नजरेत भरला. धबधब्यांव्यतिरिक्त आसिफाबाद जिल्ह्यातील वनक्षेतत्रांमध्ये प्रामुख्याने वाघही मोठया संख्येने आढळतात.

या संपूर्ण परिसराचा व्हिडीओही शेयर केला आहे. तो प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या या भागात फिरण्यास निर्बंध असले तरी असे व्हिडिओ पाहून मन फ्रेश होऊन जाते

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required