पाहा व्हिडिओ:आफ्रिकेतल्या बाप्पाचं होतं अटलांटिक महासागरात विसर्जन..

Subscribe to Bobhata

 आफ्रिकेची राजधानी अक्रा इथं गणेशोत्सवच नाही, तर नवरात्र आणि महाशिवरात्रही साजरी केली जातेय. तिथल्या काही कृष्णवर्णीयांनी हिंदू धर्म स्वीकारलाय. ते स्मार्त धर्मपरंपरा पाळतात. म्हणजेच  ते विष्णू, शिव, गणेश, सूर्य आणि शक्ती या पाचही देवांना एकसमान मानतात. तिथं १९७५पासून आफ्रिकन लोक गणेशोत्सव साजरा करत आहेत. याच आफ्रिकेतल्या गणपती विसर्जनाचा एक व्हिडिओ आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

हे लोक इथं आफ्रिकेत हाताने गणेशमूर्ती घडवतात, त्यांची पूजा करतात आणि सरतेशेवटी मूर्तीचं गणपती बाप्पा मोरयाच्या जल्लोषात अटलांटिक महासागरात विसर्जनही करतात. या व्हिडिओत तुम्हांला मोरयासोबतच, ॐ गं गणपतये नमो नम: ही स्पष्ट ऐकू  येईल..

द इंडियन एलिफंट गॉड म्हणा वा गणपती, लोकांची या गणूरायावर अपार  श्रद्धा आहे.. 

 

सबस्क्राईब करा

* indicates required