पर्सनालॉजी - काय आहे तुमच्या नशिबात ?

गॅरी गोल्डश्नायडर या अवलियानं लिहीलेले एक पुस्तक, (पुस्तक कसलं -चक्क हजार पानांचा ग्रंथ) नुकताच "बोभाटा"च्या वाचनात आला. या लेखकाने भविष्य कथनाचे वेगळेच तंत्र विकसीत केले आहे . तसा आमचा ज्योतिष शास्त्रावर फारसा अभ्यास आणि विश्वास नाही, पण आम्ही उत्सुकतेपोटी या ग्रंथातील काही लिखाणाचा पडताळा करून बघितला. आज १६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या मधील तारखांवर ज्यांचा जन्म झाला आहे, त्यांच्या स्वभावाविषयी जे गॅरी गोल्डश्नायडरने लिहीले आहे ते वाचकांपुढे ठेवतो आहे. बघा वाचून !! अगदीच काही नाही, तर मनोरंजन नक्की होईल याची खात्री आहे.

या आठवड्यात जन्माला आलेल्या व्यक्ती  हळव्या मनाच्या असतात. थोडीशी केलेली टीका त्यांना फारच झोंबते.

लहानपणी घडलेल्या काही घटनांमुळे त्यांचा स्वभाव असा नाजूक झालेला असतो, म्हणून या व्यक्तिंनी स्वतःभोवती एक संरक्षक कवच बांधून घेतलेले असते.

मोठेपणी या कवचातून बाहेर पडणे हा एक कार्यक्रम त्यांना करावा लागतो.

सहभागातून विश्वास संपादन करणे यांच्यासाठी फार महत्वाचे आहे.
कोण आहेत हे आपल्यापैकी ? 

सबस्क्राईब करा

* indicates required