computer

आपणही करा आता कॅशलेस व्यवहार : आम्ही सांगतोय ५ सोपे मार्ग

नोटाबंदीच्या धडाकेबाज निर्णयानंतर पंतप्रधान मोदींनी लक्ष केंद्रीत केलंय ते कॅशलेस अर्थव्यवस्था निर्माण करण्यावर. जगभरात अनेक विकसित देशांची अर्थव्यवस्था ही कॅशलेस प्रणालीवर चालते. मग आपणच का मागे रहायचं ? या पाहूया आपण कॅशलेस व्यवहार कसे करू शकतो...

१. युनिक पेमेंट इंटरफेस (UPI)

एखाद्याला पैसे पाठवणं किंवा एखाद्याकडून पैसे घेण्यासाठी हे UPI अॅप तुम्हाला उपयोगी ठरतं. याठिकाणी व्यवहार करताना तुम्हाला पुन्हा-पुन्हा बँक डिटेल्स भरावे लागणार नाहीत. पहिल्यांदा बँकेत जाऊन तुमचा मोबाईल क्रमांक आपल्या बँक अकाऊंटवर रजिस्टर करा. यानंतर स्मार्टफोनमध्ये UPI अॅप डाऊनलोड करा आणि त्यात तुमचा पेमेंट ऍड्रेस तयार करून तो तुमच्या बँक खात्याशी लिंक करा. झालं. हाच अॅड्रेस तुम्ही UPI मध्ये व्यवहार करताना वापरायचा आहे.

२. ई - वॉलेट

अॅप मार्केटमध्ये अनेक ई-वॉलेट्स उपलब्ध आहेत जी तुमच्या पैशाच्या पाकिटाप्रमाणं वापरता येतील. 
 यासाठी एखादं सोयीस्कर ई-वॉलेट अॅप डाऊनलोड करा. यामध्ये तुमचं डेबीट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकींग खातं देऊन अकाऊंट तयार करा. या ई-वॉलेटवरून तुम्ही वीज बील, फोन बील, मोबाईल रिचार्ज, तिकीट बुकिंग, शॉपींग अशी अनेक कामं पटकन करू शकता. 

३. डेबिट/क्रेडिट कार्ड

पेमेंटसाठी कार्ड तर तुम्ही वापरत असालच. बँक खातं उघडतानाच आपल्याला डेबीट कार्ड मिळतं. क्रेडीट कार्डसाठी तुम्ही बँकेकडे अर्ज करू शकता. खरेदीच्या  ठिकाणी POS मशिनमध्ये कार्ड स्वाईप करून पेमेंट करा. हल्ली प्रत्येक ठिकाणी कार्ड पेमेंट स्विकारलं जातं. तेंव्हा कॅश ऐवजी तुमचं कार्ड जवळ बाळगा.
 

४. आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम

जर तुमच्याकडे आधार कार्ड आहे तर ते लागलीच तुमच्या बँक अकाऊंटशी लिंक करून घ्या. आधार कार्डवर असलेली तुमची बायोमेट्रिक ओळख खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ग्राह्य धरली जाते. बाकी रकमेची चौकशी, पैसे काढणं किंवा भरणं, फंड ट्रान्स्फर, असे व्यवहार तुम्ही तुमच्या आधार क्रमांकावरून करू शकता. 

५. मोबाईल बँकिंग (USSD)

इथं तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसलं तरी साध्या मोबाईल मधूनही तुम्ही बॅलन्स चौकशी, फंड ट्रान्सफर, रिचार्ज, इ. कामे करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन तुमच्या खात्यासाठी मोबाईल बँकिंग सुविधा चालू करून घ्यावी लागेल. यानंतर तुम्ही मोबाईल मध्ये *99# हा क्रमांक डायल करून मोबाईल बँकिंग वापरू शकता.

सबस्क्राईब करा

* indicates required