नाही हो, गुगलनं चंदीगडच्या या मुलाला वार्षिक १.४४करोडोंची नोकरी दिली नाहीय..

कालपासून मूड लै वंगाळ होता राव, एक बातमी कालपासून मला सतावत होती. अहो, चंदीगडच्या एका मुलाला म्हणे गुगलनं १२ लाख रुपये दरमहिना(!) एवढ्या पगाराची नोकरी ऑफर केलीये. भाऊ, इकडं आम्ही एवढं घासतोय तरीही १२,०००रूपये मिळविण्याची मारामार होतीये आणि हा मुलगा चक्क १२ लाख कमावणार आहे. 

कालपासून या मुलाच्या बातम्या सगळीकडे फिरताहेत. काय  म्हणे या मुलानं मे महिन्यात गुगलचा इंटरव्ह्यू दिला, त्यात त्याचे ग्राफिक डिझाइनर म्हणून सिलेक्शन झालंय. आता गुगल त्याला वर्षभर अमेरिकेत ट्रेनिंग देणार, या ट्रेनिंगच्या काळात त्याचा पगार ४ लाख रुपये असणार आहे. पुढे वर्षांनंतर त्याचा पगार १२ लाख रुपये महिना करण्यात येणार आहे. कसलं भारी ना, मला पण असलं काही मिळालं तर?

खरं म्हणजे या जळजळीतून मला सगळ्यात आधी ही बातमी खोटी असावी असं फार वाटत होतं.  पण काय, जेव्हा मोठमोठाले पेपर त्याची मुलाखत छापतात म्हणजे नक्कीच तो खरा हुषार असणार अस समजून आम्ही आपल्या नशिबाला दोष देत बसलो होतो. त्याला गुगलने नोकरी दिली तर आम्हाला फेसबुक देईल या आशेने आम्ही फेसबुकवर शोधाशोध पण चालू केली होती. पण तेव्हाच या बातमीचा अपडेट आम्हाला मिळाला. तर म्हणे ही बातमी खरी नाहीय् आणि अशी कोणतीही ऑफर गुगलने दिली नाही. खुद्द गुगललाच आपण या मुलाला नोकरी दिलीय हे सोशल मिडियावरून कळालं म्हणे!!

आता कोण खरं आणि कोण् खोटं हे तुम्हीच ठरवा. तोवर आम्हाला फेसबुक नोकरी देतं का ते आम्ही शोधतो...

सबस्क्राईब करा

* indicates required