गुगल प्ले अवॉर्ड २०१७ : पाहा या वर्षी कोणत्या अॅप्सनी बाजी मारली.. 

गुगलकडून दरवर्षी i/o म्हणजेच इनपुट - आऊटपुट डेव्हलपर कॉन्स्फरन्स आयोजित केली जाते. गेल्या वर्षापासून या कॉन्स्फरन्समध्ये गुगलने प्ले स्टोअरवरील सर्वोत्कृष्ट अॅप्ससाठी गुगल प्ले अवॉर्ड्स द्यायला सुरुवात केलीय. या अवॉर्ड्समध्ये १२ वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. अॅपची उपयुक्तता, वापरकर्त्यांना येणारा अनुभव, त्यातील नाविन्यता, अशा अनेक कसोट्यांवर पात्र ठरणाऱ्या अॅप्सची इथं निवड केली जाते.

यावर्षीच्या अॅवार्ड्ससाठी मागच्या महिन्यात नामांकनं जाहीर झाली होती. १२ पुरस्कारांसाठी अंतिम शर्यतीत होती ती एकूण ५७ अॅप्स. या सर्वांमधून १२ अॅप्सनी बाजी मारून गुगल प्ले अवॉर्ड जिंकलंय. पाहूया ही अवॉर्ड विनींग अॅप्स कोणती आहेत...

बेस्ट गेम - Transformers : Forged to Fight

बेस्ट अॅप - Memrise

बेस्ट मल्टिप्लेयर गेम - Hearthstone

बेस्ट सोशल इम्पॅक्ट - ShareTheMeal

बेस्ट अॅप फॉर किड्स - 
Animal Jam - Play Wild! 

बेस्ट टिव्ही एक्स्पिरीयन्स - Red Bull TV

बेस्ट अॅन्ड्रॉईडवेअर एक्स्पिरीयन्स - Runtastic

बेस्ट AR एक्स्पिरीयन्स - WOORLD

बेस्ट VR एक्स्पेरीयन्स - Virtual Virtual Reality

स्टॅन्डआऊट स्टार्टअप - HOOKED


स्टॅन्डआऊट इन्डी - Mushroom 11

बेस्ट एक्सेसिबीलीटी एक्स्पिरीयन्स - IFTTT

सबस्क्राईब करा

* indicates required