computer

आधारकार्डावर किती सिम घेतलेत आठवत नाही? कुणी दुसरंच ते वापरत आहेत? ते सिम असे तात्काळ बंद करा.

फोनचे सिम घेण्यासाठी आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून खूपजण देतात. आपल्या आधार कार्डवर आपण २-३ सिम घेतो. कधी नवा फोन घेतला की परत सिम घेतले जातात. घरातल्या ज्येष्ठांसाठी किंवा मुलांसाठी जास्तीचे सिम घेऊन ठेवले जातात. काही वर्षांनी असे होते की आपण आधारकार्डची ओळख दाखवून किती सिम घेतले आहेत हे लक्षात ही राहत नाही. यामुळे एकाच्या नावावर बरेच नंबर राहतात.

बऱ्याचदा एखाद्या सेल्युलर कंपनीची आवडली नाही किंवा त्यापेक्षा चांगली ऑफर दुसऱ्या कंपनीने दिली तर आपण नवे सिम घेतो आणि जूने ठेवून देतो. नंबर पोर्ट करण्याची सुविधा असली तरी कटकट कशाला करून घ्या म्हणून नवीन सिम घेतलं जातं. काही दिवसानंतर आपण ते विसरून जातो. पण कधी हे सिम जर चुकीच्या माणसाच्या हाती पडले तर तुमच्या नावावर एखादा फ्रॉडही घडू शकतो. त्यामुळे आधार कार्ड वर घेतलेले सिम तुम्ही जर वापरत नसाल तर ते लगेच डीॲक्टिवेट करा. आधार कार्डवर किती सिम जोडली गेली आहेत याची माहिती कशी होणार? हा प्रश्न पडला असेल तर त्यासाठी तुम्ही दूरसंचार विभागाच्या वेबसाइटची मदत घेऊ शकता.

या वेबसाइटद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डवरून किती सिम घेतले आहेत किंवा सध्या वापरात आहेत हे शोधू शकता. तुम्ही वेबसाइटद्वारे निरुपयोगी सिम बंद करण्याची विनंती देखील करू शकता. या सेवेला टेलिकॉम ॲनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) असे नाव देण्यात आले आहे. ही सेवा अजून संपूर्ण देशात उपलब्ध नसली तरी लवकरच ती सगळीकडे सुरू करण्यात येणार आहे. सध्या ही सेवा आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही सेवा वापरणे ही खूप सोपे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला https://tafcop.dgtelecom.gov.in वर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर देऊन OTP साठी विनंती करावी लागेल. तुमच्या मोबाईलवर 6 अंकी OTP पाठवला जाईल. तो टाकला की लगेचच तुम्हाला तुम्हाला आधार क्रमांकासह नोंदणीकृत सर्व मोबाइल क्रमांक चे दाखवले जातील. वेबसाईटवर जरी फक्त तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशाच्या ग्राहकांसाठी हि सेवा आहे असे लिहिले असले तरी आम्हाला मुंबईचा क्रमांक टाकून बघता आले. 

जर तुम्हाला एखाद्या सिमबद्दल वाटत असेल की ते तुमचे नाही किंवा तुम्ही ते वापरत नाही. तसेच तुम्हाला कोणतेही सिम बंद करायचे असेल, तर तुम्हाला त्या नंबरच्या शेजारी टिक करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला रिपोर्टवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ठराविक काळानंतर ती रिपोर्ट स्वीकारली जाईल. आणि पुढची कारवाई होईल.

एकाच वेबसाईट वर फक्त क्लिकने या गोष्टी सहज होऊ शकतात. यामुळे अनेक गैरव्यवहारांना आळा बसू शकतो.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required