computer

वन्यप्राणी संरक्षक स्वतःहून गेंड्यांचे शिंग का कापत आहेत ?

हत्तींची त्यांच्या दातांसाठी आणि गेंड्यांची त्यांच्या शिंगांसाठी नेहमीच शिकार होते. दक्षिण आफ्रिकेत तर शिंगासाठी दर दिवशी ३ गेंडे मारले जातात. या घटना थांबाव्यात म्हणून कायदे तर आहेतच पण शिकारी अशा कायद्यांना जुमानत नाहीत, ते या ना त्या मार्गाने या प्राण्यांवर हल्ले करतातच. आता शेवटचा उपाय म्हणून एक नवीन मार्ग शोधण्यात आला आहे. तो क्रूर वाटत असला तरी फार महत्त्वाचा म्हणावा लागेल.

वन्यजीव संरक्षक अधिकाऱ्यांनी आता स्वतःहून गेंड्यांची शिंगं कापायला सुरुवात केली आहे, जेणेकरून शिकाऱ्यांसाठी ते गेंडे निरुपयोगी  होतील आणि त्यांचा जीव वाचेल.

या कामासाठी आधी गेंड्याला अंमलीपदार्थ दिला जातो. त्यानंतर त्याचे कान आणि डोळे बंद केले जातात. शिंगाचा जो भाग कापायचा आहे तो बरोबर ठरवला जातो. शिंगाची पुन्हा वाढ करणाऱ्या पेशी कापल्या जाऊ नये किंवा त्यांना इजा पोहोचू नये याची पूर्ण खबरदारी घेतली जाते. आणि मग शिंग कापलं जातं. ही प्रक्रिया दर १२ ते २४ महिन्यात केली जावी असं तज्ञांच मत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nat Geo WILD (@natgeowild) on

ही पद्धत चांगली आहे पण ती खर्चिक पण आहे. एका गेंड्यासाठी १००० डॉलर्स इतका खर्च येतो. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गेंड्यांना जगण्यासाठी त्या शिंगांची गरज असते की नाही यावर वाद आहेत. तज्ञांच्या मते शिंग अशापद्धतीने कापली जातात की ती पुन्हा उगवू शकतात.

तर मंडळी, ही पद्धत तुम्हाला योग्य वाटते का ? तुमचं मत नक्की द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required