computer

१९९१ मध्ये फक्त एक टेलिफोन असलेला देश आज डिजिटल क्षेत्रातला बाप झालाय, वाचा ही त्याची गोष्ट!!

इस्टोनीया -१९९१ पर्यंत या देशाचे नाव कुणाला माहिती नव्हते. कसे माहिती असणार? कारण तोपर्यंत हा देश तेव्हाच्या सोव्हिएत युनियनचा एक भाग होता. सोव्हिएत युनियनचे अनेक तुकडे झाले तेव्हा १९९१ साली या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

१९९१ साली बाह्य जगाशी संपर्क करण्यासाठी या देशात फक्त एक टेलिफोन, हो..फक्त एकच टेलिफोन लाईन होती आणि ती पण परराष्ट्र मंत्र्याच्या घरात! त्याच वेळी शेजारी देशाने म्हणजे फिनलंडने डिजिटल टेक्नॉलॉजी वापरायला सुरुवात केली. त्यांनी इस्टोनीयाला त्यांची जुनी ऍनालॉग टेलीफोन एक्स्चेंज फुकट देऊ केली. या देशाने नम्रपणे जुनी टेक्नोलॉजी नाकारून आपण पण डिजीटल यंत्रणाच वापरणार आहोत असे सांगितले..

.....आणि आज हा देश सगळ्या जगात डिजीटल तंत्रज्ञानाचा बाप म्हणून ओळखला जातो!!  कशी केली ही थक्क करणारी प्रगती या देशाने? चला वाचू या इस्टोनीयाच्या डिजीटल क्रांतीबद्दल !!

१. मार्ट लार

मार्ट लार हा तरुण जेव्हा इस्टोनीयाचा पंतप्रधान झाला, तेव्हा त्याने जुन्या कागदी कार्ययंत्रणा मोडीत काढल्या. सरकारी कागद -कार्बन कॉपी - फाईल-नोट्स या वेळ खाणार्‍या वस्तूंना तिलांजली दिली. यासाठी त्याने इंटरनेट हा नागरीकांचा मूलभूत अधिकार म्हणून मान्य केला.

२. डीजीटल सात बारा !!

त्यांच्याकडे जमीन महसूली खाते नव्हते. त्याची स्थापना क्लाउड टेक्नॉलॉजी वापरून केली. हा जगातील एकमेव देश आहे जिथे सर्व सात बारा फक्त आणि फक्त डीजिटल स्वरुपातच आहेत.

३. आयकर (इन्कमटॅक्स)

इस्टोनिया मध्ये आयकरसाठी एकच सरसकट दर ठेवला आहे. 

४. स्टार्ट-अप

उद्योगधंदा सुरु करण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल अशी कार्यप्रणाली तयार केली. म्हणूनच सर्वात जास्त स्टार्ट-अप याच देशात आहेत. स्काईप सुद्धा याच देशाची देणगी !!

५. स्काईप

२००५ साली इस्टोनिया मध्ये जन्मलेली ‘स्काईप’ ही कंपनी ‘eBay’ ला विकण्यात आली. २.६ बिलियन डॉलरला हा सौदा पक्का झाला. यातून आलेला पैसा इस्टोनियाने टेक्नोलॉजीच्या दृष्टीने स्वतःला प्रगत करण्यात लावला. जिथे कधी काळी ‘स्काईप’ जन्माला आली, ती जागा आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक महत्वाचे केंद्र म्हणून उदयास आली आहे.

६. क्लाउड टेक्नॉलॉजी

देशात ९५% छोटे मोठे व्यवहार ऑनलाईन माध्यमातूनच केले जाऊ लागले. पार्किंगसाठी पावती फाडणे वगैरे भानगड इथे नाही, पार्किंगसाठी लोक मोबाईलवरून थेट पैसे चुकते करतात. शिवाय प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याचा तपशील क्लाउड टेक्नॉलॉजीद्वारे साठवण्यात आला आहे. इथली ९५% जनता  ५ मिनिटात  आयकर भरून मोकळी होते. आहे की नाही टेक्नॉलॉजीची कमाल?

७. ऑनलाईन मतदान

आपल्याकडे वोटिंग मशीनमध्ये घोटाळे होण्याच्या बातम्या येत असताना इस्टोनीया मध्ये २००५ पासून ऑनलाईन वोटिंगची पद्धत राबवली जात आहे. ऑनलाईन मतदानास मान्यता देणारा हा पहिला देश आहे.

८. शैक्षणिक स्तर

इस्टोनियामधली तब्बल ९९.८ टक्के लोकसंख्या शिक्षित आहे. जगातील शैक्षणिक दृष्ट्या प्रगत राष्ट्रांपैकी हे एक राष्ट्र.

९. मोफत इंटरनेट !!

इस्टोनियामध्ये जवळजवळ सर्वच घरांत इंटरनेट आहे. शाळा, कॉलेज. घर तसेच सार्वजनिक ठिकाणी संगणक आणि मोफत इंटरनेटची सुविधा पुरवण्यात आली आहे. इस्टोनियामध्ये खूपच कमी वयात मुलांना टेक्नॉलॉजीशी ओळख करून दिली जाते.

१०. ProgeTiiger

जास्तीत जास्त व्यवसाय जन्माला घालणे हे इस्टोनियाचे बलस्थान आहे असं म्हणावं लागेल. याची प्रचिती गेल्याच  वर्षी आलीय. इथं  ‘ProgeTiiger’ या प्रोग्रॅमची घोषणा करण्यात आली आहे.. यांच्या अंतर्गत मुलांना वयाच्या ५ व्या वर्षापासूनच ‘कोडींग’ चं ज्ञान देण्यास सुरुवात होईल.

 

आजच्या जगाची नस ही तंत्रज्ञान आहे हे इस्टोनियाने बरोबर ओळखलं आणि म्हणूनच हा देश सगळ्या जगात डिजीटल तंत्रज्ञानाचा बाप म्हणून ओळखला जातो.

सबस्क्राईब करा

* indicates required