computer

लशीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर काय परिणाम होऊ शकतात? घाबरू नका, ही माहिती समजून घ्या !!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. जगभरात जिथे लसीकरण वेगाने झाले तिथे कोरोनाला आळा बसत आहे. भारतातही १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. 'कोव्हिशील्ड' आणि 'कोव्हॅक्सिन' लस वापरून देशात लसीकरण सुरू आहे. लवकरच १८ वर्षांच्या पुढच्या वयाच्या व्यक्तींचे लसीकरण सुरू होईल. पण याआधी लास मिळालेल्या लोकांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. अनेकांना पहिला डोस मिळून महिना उलटत आला तरी दुसरा डोस मिळालेला नाही. दुसरा डोस उशीर झाला तर त्याचा प्रकृतीवर काही परिणाम होईल का? काही अडचण येईल काय? याबद्दल अनेक संभ्रम होताना दिसत आहेत. आजच्या लेखातून आपण याविषयावर सावित्सर माहिती घेणार आहोत.

वैद्यकीय तज्ज्ञांनुसार दोन्ही लसीचे दोन्ही डोस महत्वाचे आहेत. दोन्ही लसींची म्हणजे कोवॅक्सीन आणि  कोव्हिशील्डचे परिणाम प्रभावी ठरत आहे. अमेरिकन एजन्सी Centre for Disease Control नुसार लस घेतल्यानंतर ९९.९९ टक्के प्रमाणात बाधा होत नाही. नुकतेच कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सीन याचीही आकडेवारी प्रसिद्ध झाली होती. जी सकारात्मक आहे. त्यामुळे जी लस उपलब्ध आहे ती नागरिकांनी घ्यावी. पहिला डोस ज्या लसीचा घेतला असेल त्याच लसीचा दुसरा डोस घ्यावा. लसीच्या दुसऱ्या डोसचा कालावधी ४ ते १२ आठवडे आहे. त्या कालावधीत दुसरा डोस घेतल्यास अँटिबॉडीज तयार होतील आणि आपली सुरक्षितता वाढेल.

काही कारणामुळे दुसरी लस वेळेत मिळाली नाही तरी त्याचा प्रकृतीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी त्याची काळजी करू नये. लसीकरणानंतर कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आवश्यक आणि पुरेशा अँटीबॉडी शरीरात तयार होतात. पण दोन्ही डोस पूर्ण करणे गरजेचे आहे. दुसरी लस घेतली नाही तर शरीरात पुरेशा अँटीबॉडी तयार होणार नाहीत. त्यामुळे विषाणूशी लढण्यासाठी शरीरात लशीचा जेवढा प्रभाव हवा तेवढा प्रभाव राहणार नाही. थोडक्यात सांगायचे तर केवळ एक लस प्रभावी ठरणार नाही.

समजा पहिला डोस झाल्यानंतर कोणी कोरोना पोजिटिव्ह आला, तर आधी पूर्ण उपचार करून घ्यावेत व त्यानंतर १२ आठवड्यांनी दुसरा डोस घेतला तरी चालेल. यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्लाही जरूर घ्यावा. दोन्ही डोस घेतल्यानंतर किती काळ अँटिबॉडीज शरीरात राहतील? पुढच्या वर्षी परत डोस घायला लागेल काय? याबद्दल अभ्यास चालू आहे. पण आजच्या परिस्थितीत सुरक्षेसाठी लसीकरण प्रभावी ठरणार आहे.

कोव्हॅक्सीन आणि कोव्हिशील्ड यातली चांगली लस  कोणती? खरे तर याचे उत्तर सध्यातरी कोणत्याच देशाकडे नाही. WHO ने  मे  २०२० मध्ये मांडलेल्या प्रस्तावानुसार "जगभरात  उपलब्ध सर्व व्हॅक्सीन्सच्या, जगभर अशा तौलनिक चाचण्या करत राहणारे जाळे निर्माण व्हावे." WHO चे  प्रत्येक देशाने ऐकले तर प्रभावी लास कोणती हे समोर यायला  वेळ लागणार नाही. तूर्तास अशी कोणतीच माहिती उपलब्ध नाही.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required