computer

आधार सुरक्षित करण्यासाठी असा करा आपला आधार नंबर लॉक आणि अनलॉक!!

आजच्या युगात आधारकार्ड किती महत्त्वाचे झाल आहे हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. शाळेत दाखला घेण्यापासून ते पेन्शन घेण्यापर्यंत आधार कार्ड हवेच. हे कार्ड म्हणजे आपण भारतीय असल्याचा पुरवाच असतो. आधार कार्डचा नंबर सरकारी यंत्रणेत आपल्या नावानिशी नोंदलेला असतो, त्यामुळे कुठेही हा नंबर टाकला असता आपल नागरिकत्व आणि इतर इत्यंभूत माहिती लगेच प्राप्त होते. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? की यात तुमची फसवणूक होऊ शकते. याचेच उत्तर आज आपण या लेखात समजून घेणार आहोत.

आपले आधार कार्ड अनेक प्रकारे सुरक्षित करू शकता तसेच काही नियम पाळल्यास त्याचा गैरवापर होणे टाळू शकता. UIDAI नुसार आपल्या आधारकार्डची छायाप्रत कोणत्याही संस्थेला देऊ नये, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. यू आय डी एच्या एक नवीन नियमानुसार तुम्ही मास्क्ड आधार वापरू शकता. मास्क्ड आधार म्हणजे १२ अंकी आधार नंबरच्या ऐवजी फक्त शेवटचे चार नंबर दिसतात.
त्याबरोबरच परवाना नसलेल्या खाजगी संस्था, विना परवाना हॉटेल्स आणि सिनेमागृह आधारकार्डची मागणी करू शकत नाहीत. तसेच ज्यांच्याकडे यू आय डी ए आय कडून घेतलेला परवाना आहे,त्यांनाच आधारकार्डचा तपशील मागण्याचा अधिकार आहे.
तरीही आधार कार्डशी निगडीत नागरिकांचा वैयक्तिक डाटा चोरी होण्याच्या तक्रारी येत असतात. अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यासाठी सर्वात सुरक्षित उपाय म्हणजे आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करणे. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स कराव्यात.

आधार कार्ड लॉक करण्यासाठी :-

१. आधार कार्ड लॉक करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याकडे १६ अंकी व्हर्च्युअल आयडीचा (व्हीआयडी) हवा.

आधार कार्ड व्हर्च्युअल आयडी तयार करण्यासाठी प्रथम १९४७ या नंबरवर GVID आणि आधारचे शेवटचे चार अंक असा मेसेज पाठवा. उदा. शेवटचे चार अंक १२३४ असतील तर १९४७ या नंबरवर GVID 1234 असा एसएमएस पाठवा. यानंतर तुमचा व्हर्च्युअल आयडी जनरेट होऊन तसा मेसेज येईल.

२. यानंतर आधार कार्ड लॉक करण्याचा OTP मिळविण्यासाठी तुम्ही GETOTP आणि आधारचे शेवटचे चार अंक असा १९४७ या नंबरवर मेसेज पाठवा.

३. OTP पुन्हा मिळविण्यासाठी, तुम्हाला GETOTP व्हर्च्युअल आयडीचे अंतिम ६अंक टाइप करून पाठवावे लागेल.

४. तो ओटीपी टाकल्यावर पुन्हा LOCKUID टाइप करून १९४७ या नंबरवर पाठवावा. म्हणजे आपले आधार कार्ड लॉक होईल.

आधार कार्ड अनलॉक करण्यासाठी :-
अनलॉक करण्यासाठीही तुम्हाला फक्त दोन मेसेज पाठवायचे आहेत. यासाठी तुम्हाला व्हर्च्युअल आयडी(VID) लागेल

उदाहरणार्थ व्हर्च्युअल आयडी १२३४-१२३४-१२३४-९१२३ असल्यास

एसएमएस-GETOTP ९१२३ आणि १९४७ वर पाठवा

समजा तुम्हाला "०१२३४५" म्हणून OTP प्राप्त झाला तर

SMS-UNLOCKUID ३४९१२३ ०१२३४५ आणि १९४७ वर पाठवा.

त्यानंतर आपले आधार कार्ड अनलॉक केले जाईल

अशाच प्रकारे भारतीय रहिवासी त्यांचे आधार आणि त्यांचे बायोमेट्रिक्स देखील लॉक करू शकतात. सरकारने आधार माहितीचे संरक्षण करण्याचे मार्ग देखील आणले आहेत. आपण आपला १२ अंकी आधार नंबर लॉक करून त्याऐवजी १६ अंकी व्हर्च्युअल आयडीचा (व्हीआयडी) वापर करू शकतो. पोर्टलचा वापर करणारी व्यक्ति त्याचे बायोमेट्रिक्स लॉक करून त्याचे संरक्षण करू शकते. ते आपण कधीही अनलॉकही करू शकतो.

तसेच आपला आधारकार्डचा नंबर कुणा अनोळखी व्यक्तीच्या हाती लागल्यास आपल्या बँक खात्यातून पैशाची चोरी होऊ शकते का? हाही एक प्रश्न असतो. अशा प्रकारच्या भीतीसाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने स्पष्टीकरण दिले आहे की अशा प्रकारे बँक खात्यातून पैशाची चोरी होऊ शकत नाही. जोपर्यंत आपण आपला पिन/ओटीपी एखाद्या अनोळखी व्यक्तिला अथवा हॅकरला देत नाही तोपर्यंत आपले बँक खात्यातील पैसे कुणीही काढून घेऊ शकत नाही.
तसेच इतर व्यवहारासाठी आधार नंबर जोडलेला असेल, जसे की म्युचुअल फंड, शेअरसाठीचे डीमट खाते यावरही परिणाम होत नाही. प्रशासकीय कामांसाठी बँक, सरकारी कार्यालयामार्फत कोणत्याही कारणांसाठी आधार कार्ड, त्यावरील ओटीपीची विचारणा केली जात नाही त्यामुळे अशा कोणत्याही टेलिफोनिक चौकशीला कुणी, कितीही विश्वासहर्ता दाखवली तरीही विश्वास ठेवू नये. याला सायबर हल्ला असे म्हटले जाते. आधार आणि पॅन कार्डचा तपशीलांचा वापर करून अनेक बनावट संस्था बनवल्या जाऊ शकतात. त्यामुळे आधार आणि पॅन कुणालाही वैध कारणाशिवाय देणे टाळले पाहिजे.

आधार कार्डधारकच आपली स्वतःची माहिती डेटा मधून पाहू शकतो. अन्यथा कुणीही ती उघड करू शक्त नाही. आधार कार्ड मध्ये आपण नावामध्ये दोनदा बदल करू शकता, जन्मतारखेमध्ये एकदाच बदल करणे शक्य आहे, पत्ता बदल करण्याला कोणतीही मर्यादा नाही, परंतु लिंग बदल फक्त एकदाच शक्य आहे. एका अहवालानुसार, ९५ टक्के भारतीयांकडे आधारकार्ड आहे आणि ते महिन्यातून सरासरी एकदा त्याचा वापर करतात, कारण आधार कार्ड असले की इतर काही आयडी देण्याची गरज भासत नाही. सर्व सरकारी कामासाठी , बँकेसाठी आधार कार्ड लागतेच. असे असले तरी आधार कार्ड वापरताना योग्य ती काळजी आणि नियम माहिती करून घेतले तर सुरक्षित राहू शकते.

या लेखातून तुम्हाला आधार कार्ड कसे सुरक्षित ठेवता येईल याची माहिती कळली असेल. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरुर शेअर करा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required