बोभाटाच्या किचन मध्ये आजचा खास मेन्यू : डिमसम !!

काल  हवेत गारवा आहे. अशावेळी काहीतरी गरमागरम खाण्याचा मूड बनतो आणि मग काय खावे याची चर्चा सुरु होते. गरम वाफाळता  मसाला घातलेला चहा किंवा कॉफी सोबत काहीतरी खावसं वाटतं , पण काय खावं ?  भजी ? वडे ? हम्म... हे आपले नेहेमीचे पर्याय तर आहेतच पण आज आम्ही खिलवणार आहोत गरम वाफाळते डिमसम !!

आता पहीला प्रश्न ? डिमसम म्हणजे काय तर डिमसम म्हणजे मोमोचा एक प्रकार ! मुंबईतच काय तर महाराष्ट्रात 'मोमो' अगदी सहज येताजाता नाक्यावर दिसणारा पदार्थ नाही. बोभाटाचे शेफ मित्र ‘गजानन गोंडे’ हे डिमसम स्पेशालीस्ट आहेत. आपल्यासाठी त्यांनी डिमसमची रेसिपी आणि फोटो पाठवले आहेत.

शेफ गजानन गोंडे

 

ब्रोकोली आणि बदाम डम्पलींग.

(एक विशेष सूचना. आवरणासाठीचे साहित्य एका डम्पलींगच्या प्रमाणात आहे.)

आवरण बनवण्यासाठी

पोटॅटो स्टार्च – १० ग्राम, व्हीट स्टार्च – १० ग्राम, आणि पाणी – ८ ग्राम.

 

सारण बनवण्यासाठी.

ब्रोकोली आणि बदाम – ५ ग्राम, कापलेली लाल मिरची , मीठ आणि साखर चवीपुरते, यात थोडीशी(च) वाईन आणि पाव चमचा तिळाचे तेल.

 

कृती -

 

काय मग कधी करताय ?

सबस्क्राईब करा

* indicates required