रिझर्व बँक कोणत्या नोटा काढायच्या ते कसं ठरवते? २००ची नोट काढण्यामागं हे कारण आहे बरं...

बघा ना, काही दिवसांपूर्वी अशीच अचानक २०००ची नोट आली आणि आता २०० ची.  अजून हातात आली नसली तरी या नोटेचे पण रंगीबेरंगी फोटो पाहायला मिळाले आहेत.  काही दिवसांत ही नोटही आपल्या हातात पडेल.  पण मला सांगा,  तुम्हांला कधी प्रश्न पडला आहे का हो, की हे रिझर्व बँकवाले लोक कसं ठरवतात कोणत्या नोटा छापायाच्या? तर या मागे ही एक शास्त्र आहे म्हणे. तर आज आम्ही तेच शास्त्र तुमच्यासोबत समजावून घेणार आहोत.

तर, नोटा छापताना रिझर्व बँक खराब झालेल्या नोटा, खोट्या नोटा बदलणे, आर्थिक प्रगती, चलनवाढीचा दर, या सगळ्या बाबींसोबतच लोकांना व्यवहार करण्यास सोपं व्हावं या कारणांचाही विचार करते. एखाद्या व्यवहारात सुट्टे पैसे देण्यासाठी कमीत कमी रकमेच्या  नोटा वापराव्या लागतील याचा विचार केला जातो.

(  फ्रेंच आर्मी इंजिनियर कर्नल चार्ल्स रेनार्ड )स्रोत

या विषयात बरंच संशोधन पण झालंय. त्यानुसार सुट्टे देण्यासाठी सुयोग्य डिनॉमीनेशन हे तीनच्या पटीत (power of three) केले जाते, पण दशमान पद्धतीत हे शक्य नाहीय्. त्यामुळे यांच्या जवळपास जाणारी एक आंतरराष्ट्रीय पद्धत म्हणजेच रेनार्ड सीरिजचा वापर केला जातो. फ्रेंच आर्मी इंजिनियर कर्नल चार्ल्स रेनार्ड यांनी ही पद्धत शोधली. या पद्धतीत आपल्या दशमान पद्धतीतल्या १ ते १० चे  ५, १० आणि २० अशा टप्प्यांमध्ये भाग केले जातात.

या सिरीजला प्रिफर्ड नंबर असंही म्हटलं जातं. वापराच्या सोयीसाठी नोटांच्या मूल्याचं म्हणजेच किंमतीचं हे गुणोत्तर १:२:५ असं येतं.  यानुसार १,२,५,१०,२०,५०,१००  या नोटा चलनात येतात, तर २५,७५ या नोटा येत नाहीत. भारतात असणाऱ्या चलनामध्ये २०० ची नोट हा एक हरवलेला दुवा होता  त्यामुळं आता ही नोट चलनात येणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required