तर अशा पध्दतीने इंग्रजांनी ताजमहालला महायुद्धातही सुरक्षीत ठेवलं...
मुघल सम्राट शाहजहानने आपली राणी मुमताज महलची आठवण म्हणून सुंदर असा ताजमहाल बांधला. वास्तुकलेचा अत्युत्कृष्ट नमुना असलेली ही महान वास्तू १६४८ मध्ये बांधून पूर्ण झाली होती. आणि तेव्हापासून आजही हा ताजमहाल भारताची ओळख बनून दिमाखात उभा आहे.
पण इतिहासात डोकावलं तर दिसून येईल की बरेचदा युध्द आणि परकीय आक्रमणांमध्ये प्रामुख्याने धार्मिक आणि ऐतिहासिक स्मारकांना लक्ष्य बनवलं गेलं, त्यांची तोडफोड करून त्या राष्ट्राच्या संस्कृतीला धक्का पोहोचवणं, हाही शत्रूच्या युद्धनीतीचाच एक भाग होता. भारतात अशी अनेक प्राचीन मंदिरं आणि वास्तू होत्या, ज्या युद्धात नष्ट झाल्या. पण तुम्हाला माहित आहे का? महायुद्धाच्या काळात जगातील सातवं आश्चर्य असलेला हा ताजमहाल कसा काय सुरक्षीत राहिला? या पाहूया....
![]()
दुसर्या महायुद्धाच्या काळात भारतावर इंग्रजांची सत्ता होती. त्यामुळे साहजिकच भारताचा मित्रराष्ट्रांच्या गोटात समावेश झाला. याच कारणामुळे जर्मनी किंवा जपानकडून भारताला, खासकरून भारताचा ऐतिहासिक वारसा असलेल्या ताजमहालाला लक्ष्य बनवण्याची शक्यता होती. शत्रूराष्ट्रांच्या बॉम्ब हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी इंग्रजांनी स्थानिक लोकांच्याकडून ताजमहालाच्या घुमटावर बांबूचा थर बनवला. ज्यामुळे ताजमहालाचा मुख्य हिस्सा लपवला गेला. आकाशातून पाहिल्यास हा एखादा बांबूचा थर दिसायचा. याचा उद्देशच ताजमहालाला शत्रूच्या नजरेपासून लपवणे, हा होता.

त्याकाळी आजच्याइतकी अचूक जीपीएस प्रणाली किंवा उपग्रह नसल्यामुळे सहजासहजी लक्ष्य शोधता येत नसे. म्हणूनच भारत सरकारनेही १९६५ आणि १९७१ मध्ये पाकीस्तानबरोबर युद्ध सुरू असताना याच पध्दतीचा वापर करून ताजमहालला शत्रूच्या नजरेपासून लपवलं.
![]()
आता चीनसोबत युद्ध झालं तर काय होईल हे सांगणं मात्र कठीण आहे...!!




