चेन्नईच्या विमानतळावर स्वागताला कोण उभं आहे पाह्यलं का मंडळी ?

राव, तुम्ही चेन्नई विमानतळावर उतरलात आणि तुमच्या स्वागताला रोबोट आला तर दचकू नका. कारण चेन्नई विमानतळावर प्रवाशांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी चक्क रोबोट्सना नोकरी देण्यात आली आहे.

त्याचं काय आहे ना, चेन्नई विमानतळावर २ ह्युमनॉईड रोबोट्स ठेवण्यात आले आहेत. या रोबोट्सची खासियत म्हणजे ते स्वतःहून प्रवाशांना ओळखू शकतात आणि त्यांचं स्वागत करू शकतात. प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी हे रोबोट्स त्यांच्याच लहेजात बोलूही शकतात. मानव सदृश्य असल्याने प्रवाशांना कशा प्रकारे सामोरं जायचं हे त्यांना बरोबर माहित आहे

.

स्रोत

मंडळी, सध्या तरी हे रोबोट्स चाचणीकरिता ठेवण्यात आले आहेत. त्यातील एक आगमनाच्या ठिकाणी तर दुसरा प्रस्थानाच्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. 

राव, रोबोट्सचा वापर आता काही नवीन राहिलेला नाही. तुम्हाला आठवत असेलच सोफिया नावाच्या रोबोटला तर सौदी अरेबियाचं नागरिकत्व मिळालं आहे. हे तर काहीच नाही राव, सॅम नावाचा रोबोट चक्क न्यूझीलंडच्या राजकारणात उतरणार आहे. जपान मध्ये तर एक संपूर्ण हॉटेल रोबोट चालवतात.

पुढील काळात प्रत्येकाच्या घरात रोबोट दिसला तर नवल वाटायला नको !!

 

आणखी वाचा :

जपानमध्ये रोबोट चालवत आहेत एक पूर्ण हॉटेल..

कार्यकर्ते मंडळी, तयारीला लागा... निर्माण होतोय जगातला पहिलावहिला रोबोट राजकारणी

एका देशाचं नागरिकत्व मिळवणारी पहिली रोबो, पण AI म्हणजे काय ? जाणून घ्या तिची पूर्ण कहाणी..

सबस्क्राईब करा

* indicates required