रस्त्यावर फक्त चालण्याने वीजनिर्मिती कशी होईल? हिमाचलच्या शास्त्रज्ञांचा हा भन्नाट शोध पाहा!!

आपल्या देशात कमी खर्चात आणि कमी साधने वापरून भन्नाट शोध लावणाऱ्या लोकांची कमी नाही. अधून मधून आम्ही अशा लोकांची माहिती सांगत असतोच. देशातील आयआयटी संस्था या अशा शोधांचे केंद्र आहेत असे म्हणावे लागेल.
आता हिमाचल प्रदेशातील आयआयटी मंडी येथील संशोधकांनी लावलेला शोध बघितला तर तुम्ही सुद्धा अवाक व्हाल!!! चालण्यामुुळे अनेक फायदे होतात हे तुम्हाला माहीत असेल, पण चालल्यामुळे वीज निर्मिती होते असा या इथल्या संशोधकांनी शोध लावला आहे.
या टेक्नॉलॉजीमध्ये पायजोइलेक्ट्रिक मटेरियलचा वापर केला जात असतो. पायजोइलेक्ट्रिकमुळे यांत्रिक ऊर्जेचं रुपांतर विद्युत ऊर्जेत होतं. हे कसं होतं? तर हे मटेरियल रस्ता, फुटपाथ अशा ठिकाणी जोडले जाते. जेणेकरून लोकांच्या चालण्याने, वाहतुकीने उर्जा निर्माण होईल. जेव्हा या मटेरियलवर दबाव येतो तेव्हा यांत्रिक ऊर्जेचं रुपांतर विद्युत ऊर्जेत होतं.
फक्त चालण्यामुळे हे होत असेल तर किती भारी होईल ना? पण ते एवढे सोपे नाही. या मटेरियलयपासून तयार होणारी उर्जा ही खूप कमी असते. त्यामुळे त्याला अनेक मर्यादा येत असतात.
आयआयटी मंडी येथील संशोधक हे ग्रेडेड पोलिंग या नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगाने यात काहीतरी करता येणे शक्य आहे का याचा शोध घेत आहेत. या प्रकल्पात काम करत असलेले संशोधक राहुल वैश सांगतात की, ' आम्ही ग्रेडेड पोलिंग नावाचे एक तंत्रज्ञान विकसित केले आहे. ज्यामुळे पायजोइलेक्ट्रिक मटेरियलचा वापर १०० पट वाढू शकतो.'
हा प्रकल्प पुढे जाऊन जर चांगली प्रगती करता झाला तर त्याचा फायदा भारत आणि इतर देशांना होऊ शकतो.