मुलांना मार्क्स देण्यासाठी या शिक्षिकेने शोधून काढली भन्नाट आयडिया...!!

राव, अमेरिकेतल्या एका शिक्षिकेने पेपर तपासण्यासाठी अशी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे की तुम्ही तिला सलाम कराल. आधी या शिक्षिकेची ओळख करून घेऊया.

या शिक्षिकेचे नाव आहे ‘ऐनी फातिमा’. ती अमेरिकेतल्या ‘इलिनॉय’ राज्यातील शाळेत इंग्रजी शिकवते. शिक्षिका म्हटल्यावर मुलांचे होमवर्क व पेपर तपासणे हे कर्माने आलेच. पण तिने इथे एक वेगळी कल्पना शोधून काढली. तिने इतर शिक्षकांप्रमाणे लाल पेनने ‘अंडी’ किंवा ‘Good’ लिहिण्याऐवजी पेपरवर चक्क “मिम्स” चिकटवले. मिम्स ?? हो राव मिम्स !! चला या मागचं कारण जाणून घेऊ.

हे मिम्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. उदाहरण म्हणून खालील फोटो पाहा.

मिम्सबद्दल ऐनी फातिमा म्हणते, “मुलांची हास्यास्पद आणि मजेशीर उत्तरं वाचून माझा चेहरा कसा होतो हे मुलांना दिसावं म्हणून मिम्सची आयडिया शोधून काढली”. हे सुचल्यानंतर तिने लगेचच सोशल मीडियावरचे मिम्स प्रिंट करून घेतले. दुसऱ्या दिवशी जेव्हा विद्यार्थ्यांना आपापले पेपर मिळाले तेव्हा त्यांना मिळालेले मार्क्स हे चक्क ‘मिम्स’च्या रुपात होते.

ऐनी फातिमाने मिम्स चिकटवलेले पेपर ट्विटरवर शेअर केले आहेत. १,००,००० रिट्विट आणि तब्बल ४,००,००० लाईक्स मिळवून तिची आयडिया रातोरात व्हायरल झाली. लोकांना ही आयडिया एवढी आवडली की त्यांनी ऐनीला आणखी मिम्स पाठवून दिले.

मंडळी, ऐनी फातिमा म्हणते की तिने मिम्स फक्त गम्मत म्हणून चिकटवले नाहीत तर त्या मागे आणखी एक महत्वाचं कारण आहे. कमी मार्क्स किंवा शून्य मिळालेल्या विद्यार्थ्यांवरचं दडपण या मजेशीर मिम्समुळे कमी होतं. याचा खरोखरच सकारात्मक परिणाम झाला असं आपण म्हणू शकतो. कारण ही पद्धत विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांनाही आवडली आहे.

मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही भन्नाट आयडिया ? आम्हाला नक्की कळवा !!

सबस्क्राईब करा

* indicates required