भारतीय सेना आपल्या रिटायर्ड  कुत्र्यांना का मारून टाकते? जाणून घ्या...

यात काहीच शंका नाहीये की कुत्रा हा मानवाचा सर्वात निष्ठावान आणि विश्वासू सहकारी आहे. कुत्र्यांमध्ये असणार्‍या बुध्दीमत्ता आणि स्वामीनिष्ठेमुळं पुरातन काळापासूनच माणसानं त्यांना आपल्या आयुष्यात  एका विशेष सोबत्याचं स्थान दिलेलं आहे. आजही अपंग व्यक्तींच्या देखरेखीपासून अगदी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेततही हे श्वान अत्यंत महत्वाची भुमिका बजावताना दिसतात. सैन्यात तर कुत्र्यांच्या कामगिरीला खूप महत्त्व आहे. या श्वानांना तिथं  सेनेतले बॉम्ब, ड्रग्ज, हत्त्यारे आणि शत्रूचा ठावठिकाणा शोधण्याचं  विशेष प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यांच्या सेवेमुळं आपल्या सेनेला खूपच मोलाची मदत होत असते.

स्त्रोत

पण आपल्या सहकाऱ्यांचे प्राण रक्षण करणारे हेच श्वान जेव्हा सेवेतून निवृत्त होतात, तेव्हा मात्र त्यांना  सेनेकडून मारून टाकलं जातं. मध्यंतरी ही बाब लोकांसमोर आल्यानंतर बर्‍याच लोकांनी आणि प्राणी मित्र संघटनांनी या गोष्टीवर नापसंती दर्शविली. पण हे करण्यामागचं कारण सेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय. सेनेचाच एक भाग असल्यामुळे या श्वानांना सेनेच्या बर्‍याच गुप्त ठिकाणांबद्दल माहिती असते. अशात रिटायर झालेले हे श्वान देशविघातक कृत्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तीच्या हाती लागले, तर देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. असं घडू नये म्हणूनच या श्वानांना मृत्यू दिला जातो. सेवेत असणारे एखादे श्वान आजारी पडल्यास त्याच्यावर सर्व आवश्यक ते उपचार केले जातात. पण जर एका महिन्याच्या कालावधीत त्याचं आजारपण न संपल्यास त्याला मृत्यू देण्यात येतो.

अमेरिकेत दरवर्षी जवळपास ३०० श्वान सेनेतून रिटायर होतात. पण तिथं त्यांना नागरिक किंवा सेनेच्याच लोकांकडून पाळण्यासाठी घेतलं जातं. रशियामध्येही या श्वानांना त्यांच्याच हॅन्डलरकडून दत्तक घेतलं जातं आणि त्यांची विशेष काळजी घेतली जाते. भारतातही काही राज्यात श्वानपथकांमधून निवृत्त झालेल्या श्वानांना दत्तक दिलं जातं. पण वस्तुस्थिती अशी आहे की बऱ्याच श्वानांना मारून टाकण्यात येतं..

सबस्क्राईब करा

* indicates required