व्हिडीओ: 4 सप्टेंबर 1907 ला भारतीय स्थलांतरित समूहावर वॉशिंग्टनमध्ये हल्ला झाला होता. हा अमेरिकेत भारतीयांवर पहिला हल्ला होता?

4 सप्टेंबर 1907 च्या रात्री सुमारे 250 भारतीयांवर हल्ला करून त्यांना घराबाहेर काढण्यात आले होते. हा प्रकार घडला होता अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील बेलिंगहॅम येथे.  या प्रकाराची सुरवात झाली ते गोऱ्या वंशाच्या एका जमावाने दोन "ईस्ट इंडियन वर्कर्स" वर हल्ला केल्यानं.  आणि थोड्याच वेळात 500 गोरे लोक रस्त्यावर उतरले.

1900 व्या शतकाच्या सुरुवातीला भारतातील ब्रिटिश राजला कंटाळून काही भारतीय लोक रोजगाराची नवी संधी शोधण्यासाठी उत्तर अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. बेलिंगहॅम शहरात असणाऱ्या गिरण्या या भारतीय कामगारांना साठी रोजगाराची मोठी संधी होती. पण हळूहळू गोऱ्या कामगारांमध्ये अस्वस्थता पसरायला लागली. स्वस्तात काम करणारे काळे लोक आपल्या नोकऱ्या पळवणार याची भीती निर्माण झाली. त्यातूनच 2 सप्टेंबरला एक मोर्चा काढण्यात आला आणि दोन दिवसांनी याचे रूपांतर भारतीय लोकांच्या विरोधातल्या हल्ल्यात झाले.

या प्रकाराला अँटी हिंदू रायट्स नावाने ओळखले गेले आणि त्याचे लोकल मीडियामध्ये सुद्धा बरेच कव्हरेज करण्यात आले होते. या घटनेच्या 100 वर्षांनंतर 2007 मध्ये बेलिंगहॅम हेरॉल्ड या पेपरने आपल्या कव्हरेजबद्दल माफी मागितली होती. त्याचसोबत बेलिंगहॅमच्या मेयरने सुद्धा घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली होती.

अजूनही आशियाई लोकांना स्वस्तातले मजूर म्हणून ओळखलं जातंय आणि आपण त्यांच्या नोकऱ्या पळवू ही शंका अजूनही पाश्चात्यांच्या मनात आहे.. 

सबस्क्राईब करा

* indicates required