ऑफीसर्स चॉइस - भारतीय व्हिस्की झालीय जगातली एक नंबरची व्हिस्की !!

पावसाळा सुरु झालाय. आता थोड्याच दिवसात श्रावण पण येईल, आणि तो येण्याआधी गटारी अमावस्याही येईल. गटारीच्या आसपास दारुचा पूर वहायला लागेल. म्हणून सर्व मद्यपान शौकीनांसाठी एक खास बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. ती बातमी अशी की, ऑफीसर्स चॉईस ही भारतीय व्हिस्की जगातील सर्वाधीक खपाची - एक नंबरची  ठरली आहे. 

IWSR * या कंपनीच्या पाहणीनुसार २०१७ या एक वर्षात ऑफीसर्स चॉईसचे तीन कोटी पंधरा लाख खोके विकले गेले. एका खोक्यात ९ लिटर व्हिस्की असते. ऑफीसर्स चॉईस हा मुंबईच्या अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टीलर्स या कंपनीच्या मालकीचा ब्रँड आहे. 

मॅक्डॉवेल व्हिस्की आणि इम्पिरीअल ब्लू व्हिस्की यांचाही नंबर सर्वाधिक खपणार्‍या पहिल्या दहा नंबरात आहे. यांपैकी इम्पिरीअल ब्लू दारु न पिणार्‍यांचा पण आवडता ब्रँड आहे, तो त्या कंपनीच्या खट्याळ जाहिरातींसाठी आणि " प्यार की राह में चलना सिख" साठी !!!
 

स्रोत

स्रोत

या सर्व व्हिस्कींना मास मार्केट व्हिस्की असे संबोधले जाते आणि मास मार्केटचा विचार केला तर जगात तयार होणारी अर्ध्याहून अधिक व्हिस्की भारतात प्यायली जाते.

आता ही बातमी कोणत्या नजरेनी बघायची हा एक मोठा प्रश्न आहे. आपण एक नंबरला आलो याचा आनंद व्यक्त करायचा, की दिवसेंदिवस दारुचा खप वाढतो आहे याचे दु:ख व्यक्त करायचे ? 
टेक इट इझी बॉस. इतका विचार करण्यापेक्षा ही अ‍ॅडच बघा ना !!!

 *IWSR ही  Drinks Market Analysis करणारी कंपनी आहे .

सबस्क्राईब करा

* indicates required