नौसैनिकांच्या निष्काळजीपणामुळे निकामी झाली 'अरिहंत' !!

आयएनएस अरिहंत ही भारतीय बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आहे. आण्विक शस्त्रांनी मारा करू शकेल अशी तिची बनावट आहे. पाण्यातून विमानालाही लक्ष्य करू शकेल इतकी तिची क्षमता आहे. अण्वस्त्रधारी असल्याने अरिहंत अर्थातच सैन्यासाठी अत्यंत महत्वाची पाणबुडी आहे. पण ही पाणबुडी सध्या तरी नौदलाच्या निष्काळजीपणामुळे निकामी होऊन बंद पडलेली आहे.

हा अपघात झाला कसा ?

मंडळी, अरिहंतसारख्या आण्विक पाणबुडीची जशी काळजी घेतली जावी,  तशी ती घेतली गेली नाही. १० महिन्यांपूर्वी पाणबुडीचा मागचा 'हॅच' (लोखंडी दार) उघडा राहिल्याने त्यातून पाणी आत शिरलं आणि पाणबुडीचा ‘प्रॉपेलसन कंपार्टमेंट’ बंद पडला. ही घटना मानवी निष्काळजीपणामुळे घडली होती.

पाणबुडीत 'हॅच' हा अश्या प्रकारचा असतो (स्रोत)

The Hindu या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार १० महिन्यांपासून पाणबुडीच्या डागडुजीचं काम सुरु आहे. आण्विक पाणबुडी असल्याने तिची दुरुस्ती करण्यासाठी वेळ आणि मेहनत लागत असल्याने तिला पुन्हा कार्यरत व्हायला अजूनही वेळ लागेल असं दिसतंय.

नौदलाने चूक केली असली तरी, याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले आहेत. आपल्यावर ‘डूख’ धरून बसलेला चीन अशावेळी गप्प कसा बसणार ?? चीनने त्यांच्या वृत्तपत्रात म्हटलंय की “आण्विक पाणबुडीला काळजीपूर्वक देखभाल, काटेकोर व्यवस्थापन आणि ऑपरेशनची गरज असते आणि या कामात भारतीय नौदल सपशेल अयशस्वी ठरलं आहे.” अशा आधुनिक तंत्रज्ञानाला हाताळण्यासाठी आपण अजून तयार नाही आहोत असं त्यांचं म्हणणं आहे.

निष्काळजीपणाचा परिणाम किती गंभीर होऊ शकतो, हे तर आपल्याला मान्य करावंच लागेल.  त्यासाठी चीनने वेगळं काही सांगायला नको. यापुढे अशी चूक घडणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. शेवटी हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे राव...

सबस्क्राईब करा

* indicates required