computer

आयपीएस अधिकाऱ्याने सांगितल्या आहेत यूपीएससी क्रॅक करण्याच्या रामबाण टिप्स !!

यूपीएससी परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. ती यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांसाठी अनेकजण जीव तोडून अभ्यास करत असतात. अनेक नोट्स, पुस्तकांचा अभ्यास करतात. बऱ्याच जणांना पहिल्यांदा यश येत नाही ते पुन्हा प्रयत्न करतात. कोचिंग क्लासही विद्यार्थ्यांना ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी भरपूर फी घेतात. यावर्षीच्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयपीएस अधिकारी लक्ष्य पांडे यांनी ट्विटरवर खूप महत्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच मदत होईल.

आयपीएस अधिकारी 'लक्ष्य पांडे' यांनी २०१८ मध्ये ही परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. पूर्ण भारतात त्यांचा रँक ३१६ आहे. सध्या ते दिल्लीत सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा वैयक्तिक अनुभव तर त्यांनी शेयर केलाच आहे, त्याशिवाय त्यांनी त्यांच्या हातांनी लिहिलेल्या नोट्सही शेयर केल्या आहेत. त्यांनी दिलेली एक महत्त्वाची टीप म्हणजे कोणत्याही कोचिंग क्लासपेक्षा स्व:अध्ययन कधीही जास्त उपयुक्त ठरते. स्वतः महत्वाच्या नोट्स काढून त्याची उजळणी केल्यास ती जास्त उपयोगी ठरते. विषयानुसार कुठली पुस्तके घ्यावी हे खूप महत्वाचे आहे. पुस्तकांच्या नावांची यादीच त्यांनी पोस्ट केली आहे. त्यानंतर दुसरी टीप त्यांनी ही सांगितली, की रोज कमीत की एक तास वर्तमानपत्र वाचावे. एक व्यवस्थित टाइमटेबल बनवून ते तंतोतंत पाळावे. त्यामध्ये दररोज व्यायाम, ४-५ तास अभ्यास, ७-८ तास झोप, तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत थोडा वेळ घालवावा.

अभ्यास सुरू करताना कुठल्या विषयापासून सुरुवात करावी हेही सांगितले आहे. Polity या विषयाने सुरूवात करून त्यानंतर आधुनिक इतिहास, भूगोल, पर्यावरण आणि विज्ञानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अभ्यासात एक ध्येय ठेवावे त्यानुसार त्या विषयाचा खोलवर अभ्यास करावा. टेस्ट सिरीजही सोडवाव्यात, त्याने सराव चांगला होतो.

या महत्वाच्या टिप्स आणि नोट्स पांडे यांनी दिल्यावर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. या टिप्स  उपयोगात आणून अनेकांना नक्कीच फायदा होईल.

सबस्क्राईब करा

* indicates required