या ब्रिटीश अभिनेत्याने कोणत्या विचित्र पद्धतीने जागतिक विक्रम केला आहे? हा विक्रम सोपा वाटतो का?

जगभरात लोकं जागतिक विक्रम करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. गिनीजबुकमध्ये नाव यावे हे तर अनेकांचे स्वप्न असते. त्यातले काही जागतिक विक्रम तर इतके वेगळे आणि विचित्र असतात की ते वाचून विश्वास बसत नाही. यातही विक्रम करता येऊ शकतो? असा प्रश्न पडतो. असाच एक जागतिक विक्रम ब्रिटिश मालिका TOWIE चा स्टार जेम्स बेन्नीविथ याने केला आहे.
जेम्सने रोलरकोस्टर चालविताना एका मिनिटांत सर्वात जास्त शहरांच्या राजधान्या ओळखून सांगण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्याने एक मिनिटात ३८ वेगवेगळ्या शहरांच्या राजधान्यांची नावे सांगितली आहेत. तसा अगदी सोपा वाटणारा विक्रम खरंतर किती अवघड आहे हे रोल्लेरकोस्टर मध्ये बसताना एखाद्याला जाणवेल. थोरप पार्क येथे कोलोसस चालविताना जेम्सने हा विक्रम केला. हा विक्रम करण्यासाठी त्याने TOWIE चा सहकलाकार डॅनची मदत घेतली. डॅनने हेडफोनच्या साहाय्याने प्रश्न विचारले होते. हे सगळं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अॅडज्युडीकेटर जॅक ब्रॉकबँक याच्या उपस्थित घडलं.
— James Diags (@JamesBennewith) May 24, 2021
या रविवारी मालिकेच्या अंतिम फेरीत जेम्सचा ३० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्टी आयोजित केली गेली तेव्हा त्याने हे जाहीर केले. तो खूप आनंदी होता. त्याने सांगितले लहानपणापासून त्याच्याकडे गिनीज विश्वविक्रमाचे पुस्तक आहे. त्यामध्ये स्वतःचे नाव असणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. यापूर्वीचा विक्रम युरोपा पार्क येथील जर्मन नागरिक आर्टजॉम पुशने केला होता. त्याने २७ शहरांची नावे सांगितली होती.
जेम्सने ट्विटरवर या नवीन विश्वविक्रमाची बातमी पोस्ट केली. त्याला अनेक अभिनंदाचे मेसेजही आले. अखेर त्याने त्याचे गिनीज बुक मध्ये नाव नोंदवायचे स्वप्न पूर्ण केले.
लेखिका: शीतल दरंदळे