केरळ मध्ये तयार होत आहे 'जगातील सर्वात मोठं पक्षी शिल्प'..वाचा पूर्ण माहिती !!

रावणाने सीतेचं हरण करू नये म्हणून शेवटपर्यंत प्रत्यक्ष रावणाशी लढलेला जटायू हे रामायणातील एक महत्वाचं पात्र आहे. रामायणातील या घटनेत जिथे जटायूला वीरमरण आलं, ती जागा केरळच्या कोल्लम जिल्ह्यात आहे. या भागाला चादायमंगलम नावाने ओळखलं जातं. केरळ सरकारने या पौराणिक जागेचं महत्व लक्षात घेत इथे एक ‘जटायू पार्क’ तयार करायला घेतला आहे.

६५ एकर जागेत जटायू उद्यान तयार करण्यात येत आहे. उद्यानाबरोबर हे एक ऍडव्हेंचर पार्कदेखील आहे. आर्चरी, शूटिंग, रॉक क्लाइंबिंग सारखे साहसी खेळाची मजाही इथे घेता येणार आहे. मंडळी जटायू पार्कचं मुख्य आकर्षण असणार आहे जटायूचं एक भव्य दिव्य शिल्प. हे शिल्प जगातील सर्वात मोठं पक्षी शिल्प असून याची लांबी तब्बल २०० फूट आणि रुंदी १५० फूट असणार आहे.

स्रोत

मंडळी, ही सर्व कल्पना ‘राजीव अंचल’ या दिग्दर्शकाची आहे. राजीव हे दिग्दर्शनाबरोबरच मूर्तिकार आणि कला दिग्दर्शक देखील आहेत. १२ वर्षांपूर्वी त्यांना ही कल्पना सुचली होती. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारमार्फत या कामासाठी मंजुरी घेतली. ते जटायूपुरा पर्यटन लिमिटेड या संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत.

असं म्हणतात की, हे शिल्प नेमकं त्याच जागी आहे जिथे कधी काळी जटायू मरण पावला होता. मजेशीर गोष्ट म्हणजे या भव्य शिल्पाच्या आतून आपण थेट जटायूच्या डोळ्यांपर्यंत जाऊ शकतो. आत एक थिएटर असल्याचंही बोललं जात आहे. या थिएटरमध्ये पडद्यावर आपल्याला जटायू आणि रावण यांच्यात झालेले युद्ध दाखवण्यात येईल.

स्रोत

मंडळी, बातमी अशी आहे की एप्रिल, २०१८ पर्यंत जटायू पार्क सर्वांसाठी खुलं होईल. संपूर्ण पार्कचं काम आता शेवटच्या टप्प्यात आलंय.  केरळच्या सौंदर्यात या जटायू पार्कमुळे आणखी भर पडली आहे. आणि आपल्याला केरळला जायचं आणखी एक कारणसुद्धा सापडलंय....

स्रोत

तूर्तास आपल्याला एप्रिलपर्यंत वाट बघावी लागणार आहे पण एप्रिलमध्ये केरळला जायचा प्लॅन नक्की करा राव !!

सबस्क्राईब करा

* indicates required