लई भारी प्राईम अॉफर : जीओचे हे प्लान्स म्हणजे सोन्याहून पिवळं!!

      काय बुवा... जीओच्या फ्री सर्व्हिस मुळे गेले ५ महिने अगदी खुशीत गेले असतील ना ? पण आता मार्च सुरू झालाय आणि मार्च संपला रे संपला की एप्रिलच्या पहिल्या तारखेपासून तुम्हाला जीओच्या 4G इंटरनेटसाठी पैसे मोजावे लागतील. पण घाबरू नका. जीओचे हे पेड प्लान्सही अगदीच लई भारी आहेत. चला तुम्हाला समजावतो...

  जीओची नवी प्राईम मेम्बरशीप घेण्यासाठी तुम्हाला एका वर्षाचे ९९ रूपये भरावे लागतील. ते तुम्ही जीओ वेबसाईट, अॅप कींवा जीओ-केअर मधून भरू शकता. आणि तेही मार्च संपायच्या आत. एकदा का तुम्ही जीओचे प्राईम मेम्बर झालात की तुम्ही खालील पैकी हवा तो प्लान वापरू शकता. प्राईम मेम्बर्ससाठी मोफत एसएमएस आणि कॉल्स ची सुविधा सुरूच राहील. 

१. पहिला प्लॅन आहे १४९ रूपयांचा. इथे तुम्हाला २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा मिळेल.

२. दुसरा प्लॅन ३०३ रुपयांचा आहे. यामध्ये २८ दिवसांसाठी तुम्हाला २८ जीबी डेटा मिळेल. एका दिवसात तुम्ही १ जीबी डेटा खर्च करू शकता.

३. तिसरा प्लॅन आहे ४९९ रूपयांचा. यातून तुम्हाला २८ दिवसांसाठी ५६ जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच दिवसाला तुम्ही २ जीबी डेटा वापरू शकता.

स्त्रोत

 

इतका सारा डेटा आणि सोबत मोफत कॉल, एसएमएस! झालात ना खुश? मग आता आणखी एक खुशखबर ऐका...

प्राईम मेम्बरशीप घेतलेल्यांसाठी जीओने 'बाय वन गेट वन' नावाची अॉफर आणलीय. यानुसार तुम्ही ३०३ रूपयांचा पॅक मारल्यास तुम्हाला २८ जीबी डेटा तर मिळेलच. सोबत बोनस म्हणून ५ जीबी एक्स्ट्रा म्हणजेज एकूण तुम्हाला ३३ जीबी डेटा मिळेल. 

अशीच अॉफर ४९९ रूपयांच्या पॅक सोबत मिळणार आहे. या ५६ जीबी सोबत तुम्हाला जास्तीचा १० जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेज एकूण ६६ जीबी. 

मग वाट कसली बघताय? पटकन ९९ रूपये भरा आणि मार्च संपायच्या आत जीओची प्राईम मेम्बरशीप घ्या. 

सबस्क्राईब करा

* indicates required