ता ना ना री, मोबाईल आहे फ्री - जिओची सुप्पर डूप्पर ऑफर !!

मंडळी जिओ सर्विस लाँच झाल्यापासून धमाका करत आली आहे. जिओ आज आणखी एक धमाका घेऊन आलंय. जिओचा नवीन स्मार्ट फोन लाँच करण्यात आलाय आणि हा स्मार्टफोन चक्क फुकटात मिळणार आहे राव.

रिलायंस इंडस्ट्रीच्या आजच्या बैठकीत ही फाडू घोषणा करण्यात आली. रिलायन्स जिओचा 4G VoLTE फीचर फोन LYF ब्रँडअंतर्गत येणार आहे. या फोनची किंमत जरी शून्य असली तरी सिक्युरिटी डिपॉझीट म्हणून तुम्हाला १५०० रुपये ठेवावे लागणार आहेत. पण मग तुम्ही विचाराल, हा फोन फुकट कसा ? तर हे १५०० रुपये तुम्हाला ३ वर्षांनी परत केले जातील.


या फोनमध्ये कोणकोणते फिचर असतील ?

2.4 इंच आकाराची स्क्रीन 
512 MB रॅम,
4 GB इंटर्नल स्टोरेज
ड्युअल सिम स्लॉट
2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
VGA फ्रंट कॅमेरा
डेडिकेटेड की असणारी टॉर्च लाइट 
2000mAh क्षमतेची बॅटरी
ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट


हा फोन ग्राहकांना १५ ऑगस्ट पासून मिळेल.  पण त्यासाठी ४ ऑगस्टपासून बुकिंग सुरु होणार आहे. मुकेश अंबानीनी इथेच न थांबता आणखी एक सरप्राईजची घोषणा केली  आहे. डिजीटल फ्रीडम डेटा प्लॅन १५ ऑगस्ट पासून लाँच होईल. त्यात १५३ रुपयात अनलिमिटेड कॉलींग आणि डेटा मिळणार आहे.

तर मंडळी आहे की नाही स्वस्त आणि मस्त??

सबस्क्राईब करा

* indicates required