कलावंतीणीच्या गडावर ट्रेकचा विचार करताय? मग हा व्हिडिओ आधी पाहा..

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात लोकांना ट्रेकचे वेध लागतात. कलावंतीणीचा गड लोकांचा आवडता किल्ला असला तरी तितकाच डेंजरस आहे. हा गड आहे उत्तरकोकणातल्या माथेरानजवळ. इतिहासकारांचं म्हणणं आहे की तो बौद्ध कालात उभारला गेला आहे. या गडासमोरच आहे प्रबळगड.   त्याचं आधीचं नांव होतं मुरंजनगड.  चढायला आणि जिंकायला अवघड अशा या किल्ल्याचं शिवरायांनी नांव बदललं- प्रबळगड!! 

फोटोवरून दिसतंच आहे की पायर्‍या असल्या तरी या गडावर चढणं किती धाडसाचं आहे. एकदम सरळ उभ्या कपारीतल्या पायर्‍या आणि दुसर्‍या बाजूला खोल दरी.  खाली पाहिलं तरी डोळे फिरतील अशी. व्हिडिओमध्ये तर तो उतार आणखीच धोकादायक वाटतो आहे. असा हा अवघड किल्ला ज्यांनी बांधला त्या लोकांना सलाम!! जाणकार ट्रेकर्सचं म्हणणं आहे की हा वरचा कलावंतीणीच्या गडाचा फोटो प्रबळगडावरून घेतलाय. 

लक्षात आलं ना? नुकतीच ट्रेकिंगला सुरूवात केली असेल तर कलावंतीणीच्या गडाचा विचारदेखील करू नका. 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required