सगळीकडे चर्चा आहे कमलप्रीत कौरला फायनलमध्ये पोचवणाऱ्या 'मॉंस्टर थ्रो'ची. तुम्ही व्हिडिओ पाह्यलात का?

ऑलिम्पिक जसजसे पुढे सरकत आहे तसतसे भारताला दुसरे पदक केव्हा मिळेल याबद्दलची उत्सुकता वाढत आहे. अनेक खेळाडू पदकाच्या अगदी जवळ पोहोचले होते. पण थोडक्यात त्यांचा पराभव झाला. असे असले तरी सर्व खेळांत खेळाडूंचा कस लागत आहे आणि भारतीय खेळाडू जिंकले किंवा नाही जिंकले तरी, त्यांचे खेळ पाहाणं किंवा क्लालिफाईंग मॅचेस पाहाणं ही मोठी मौज आहे.

आम्ही आता बोलत आहोत पात्रता खेळीतल्या एका भारतीय खेळाडूच्या कामगिरीबद्दल. खेळ आहे थाळीफेक आणि तिथे सध्या चर्चा आहे नजरेत भरणारा खेळ केलेल्या कमलप्रीत कौरची.

महिलांच्या थाळीफेकमध्ये सहभागी झालेल्या कमलप्रीत कौरने ६४ मीटर थ्रो मारत ३१ स्पर्धकांमध्ये ऑटोमॅटिक पात्रतेच्या माध्यमातून फायनलमध्ये धडक मारली. थाळीफेक खेळात सहभागी झालेल्या खेळाडूंना ६४ मीटरच्या पुढे थाळी फेकायची असते किंवा सर्वात दूर फेकणारे १२ खेळाडू हे पुढे निवडले जातात. कमलप्रीत आणि अमेरिकेची वलारी अलमेन या दोनच खेळाडूंनी ६४ मीटरच्या पुढे थाळी फेकली.

या थाळीफेकेसाठी प्रत्येक खेळाडूला ३ संधी दिलेल्या असतात. कमलप्रीतने पहिली थाळी ६० मीटर दूर फेकली. पण तिसऱ्या फेरीत ६४ मीटर थाळी फेकत तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी भारताची दुसरी खेळाडू सीमा पुनिया मात्र फायनलमध्ये जाऊ शकली नाही. ६० मीटरहून अधिक दूर तिला थाळी फेकता आली नाही.

कमलप्रीत कौरने ६४ मीटर थाळी फेकल्याने ती फायनलसाठी ऑटोमॅटिक पात्र ठरली आहे. मात्र तिच्या थाळीफेकीचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच वायरल झाला आहे. लोकांनी याला 'मॉंस्टर थ्रो' असे नाव दिले आहे. कुणीही हा व्हिडीओ बघितल्यावर कमलप्रीतचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. याच कारणाने कमलप्रीतकडून पदकाच्या सुद्धा आशा पल्लवित झाल्या आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required