सुलोचनवाला कमलेश शाळेत जातोय ? खबर खरी की खोटी?

Subscribe to Bobhata

‘कमलेश सुलोचन’ हे एव्हाना सगळ्यांनाच ओळखीचं झालंय. दिल्लीच्या रस्त्यांवरच्या नशेबाज लोकांवर तयार केलेल्या डॉक्युमेंटरी मध्ये तो दिसला. त्याच्या व्हायरल व्हिडीओचे अनेकांनी जोक्स बनवले आणि खूब मजा लुटली. आता या जोक्स आणि मिमचा ओघ कमी झाला असला तरी माणसं कमलेशला विसरलेली नाहीत.

मंडळी, सध्या एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा नवीन व्हिडीओ दाखवतो की कमलेश आता चक्क शाळेत जातोय. सहावी इयत्तेत तो आता शिकत आहे, त्याने ‘सुलोचन’ सोडलंय आणि हे बघून अनेकांना वाटतंय की मिम, फनी व्हिडीओ, जोक्समुळे हा मुलगा आता चांगल्या मार्गाला लागलाय. म्हणजे जे लोक म्हणत होते की या मुलावर जोक करू नका त्यांना चांगलाच धडा मिळाला.

मंडळी हा व्हिडीओ जर खरा असता तर आम्हालाही आनंद झाला असता पण हा दुर्दैवाने हा व्हिडीओ खोटा आहे. बिंग इंडिअन या वेबसाईटने धीरज शर्माशी संपर्क केला. हा धीरज शर्मा म्हणजे “नशेबाज- द डाइंग पीपल ऑफ दिल्ली” या डॉक्युमेंटरीचा दिग्दर्शक. याच डॉक्युमेंटरी मधून कमलेशची व्हिडीओ क्लिप लिक झाली होती.

धीरज शर्माने सांगितलं की “कमलेश हा आता १७ ते १८ वर्षांचा असेल, त्यामानाने या व्हिडीओत दिसणारा मुलगा हा खूपच लहान आहे.” मंडळी नीट बघितलं तर तुम्हाला जाणवेल की हा तो मुलगा नव्हे. हा नवीन व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी याबद्दल शंका व्यक्त केली आणि शेवटी ते खरे ठरले आहे.

मंडळी या नवीन व्हिडीओतून हेच दिसतं की लोकांनी कमलेशला अजूनही सिरीयसली घेतलेलं नाही !!

सबस्क्राईब करा

* indicates required