computer

हा कलाकार चक्क हवेत चित्र काढतो? काय आहे ही भन्नाट कला??

भारतात प्रचंड प्रतिभा असलेले कलाकार आहेत. काही वाळूवर, काही शेतात मातीवर, काही पिकांवर तर काही पानाफुलांवर भन्नाट असे चित्र काढत असतात. मात्र केरळ येथील एक पठ्ठ्या मात्र हवेत चित्र काढतो. नवल वाटत आहे ना? पण हे खरे आहे. 

केरळ येथील केपी रोहित नावाचा हा कलाकार आहे. तो दगडांच्या मदतीने चित्रे काढतो. या दगडांच्या चित्रात तो रंग देखील भरतो. आता हवेत चित्र काढण्याचा विषय कसा येतो मग? तर हे दगडांचे चित्र तो जेव्हा हवेत उडवतो तेव्हा ६ सेकंद ते चित्र हवेत दिसत असते.

स्वतः मोहनलालने जेव्हा हे चित्र बघितले तेव्हा त्यांनी देखील रोहितचे कौतुक केले. रोहितने एक युट्यूबला व्हिडिओ बघितल्यावर त्याला असे चित्र काढण्याची कल्पना सुचली. हळूहळू शिकत मग त्याने स्वतःच चित्र काढले. त्याने काढलेले दगडांचे चित्र स्लो मोशनमध्ये बघितल्यास त्याने केलेली कमाल आपल्याला दिसून येते. 

रोहितने मोहनलाल सोबत मेस्सी, रोनाल्डो यांचे पण चित्र काढले असून पुढील काळात आपल्या प्रतिभेला अजून चांगले करण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. लॉकडाऊन मधील वेळेचा सदुपयोग करत अनेकांनी फायदा करून घेतला रोहितला देखील आपल्या कलेत नवीन भर घातली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required