computer

फेसबुकवर कमेंट करताना हे शब्द वापरा, आणि जादू अनुभवा !!

फेसबुकवर ठराविक शब्दांवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अॅनिमेटेड चित्र दिसू लागतात, जसं की अभिनंदन लिहिलं की फटाके फुटतात, bff लिहिलं की दोन हात येऊन टाळ्या मारून जातात, XOXO लिहिलं की बदाम दिसतात. फेसबुकने या नवीन गोष्टी काहीच महिन्यापूर्वी आपल्या समोर आणल्या. सुरुवातीला अमुक अमुक लिहा आणि जादू बघा अश्या सदराखाली या गोष्टी खपवल्या गेल्या.

काहीच दिवसापूर्वी एक नवीन पोस्ट फिरत होती. त्यात असं म्हटलं होतं की, तुम्ही Bff लिहिलत आणि तो शब्द हिरवा झाला तर तुमचं अकाउंट सुरक्षित आहे. याबद्दल स्वतः झुक्या भाऊने फेसबुक पोस्ट वरून माहिती दिली होती असही म्हटलं जात होतं. ती पोस्ट सुद्धा इंटरनेटवर फिरत होती. पण अर्थात हे खोटं होतं. कोणत्याही शब्दाच्या रंगामुळे तुमचं अकाउंट सुरक्षित आहे की नाही हे समजत नाही.

अश्या अफवा पसरत राहिल्या आणि अजूनही पसरत आहेत. म्हणून आज आम्ही घेऊन आलो आहोत त्या शब्दांची यादी ज्यांच्यामुळे फेसबुकवर जादू होते !!

१. चांदण्या

शब्द - you’re the best

२. दे ताली !!

शब्द – bff किंवा bffs

३. हातातील जादू

शब्द - Best Wishes

४. सतरंगी अंगठा

शब्द - you got this, you’ve got this, you can do it

५. अंगठे

शब्द – Rad, Radness (विलक्षण किंवा विस्मयकारक)

६. फुगे

अभिनंदन , Congrats, Congratulations, बधाई, बधाई हो, शुभकामनाएं, शुभकामनाएँ

७. बदाम

शब्द - Xo, xoxo, xoxoxo

सबस्क्राईब करा

* indicates required