हरयाणात चक्क रस्ता वर येतोय? हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच!!

सध्याचा निसर्गाचा कोप सुरू आहे. कुठे दुष्काळ, कुठे पूर तर कुठे दरडी कोसळणे अशा घटनांनी जनजीवन अक्षरशः हादरून गेले आहे. पर्यावरण बदलामुळे गेल्या काही वर्षात निसर्गाचे रौद्ररूप समोर येत आहे. परदेशात मोठ्या आगी लागणे, बर्फ वितळणे अशा बाबी समोर येत असतात.
हरियाणात घडलेल्या ज्या घटनेबद्दल आज आपण बोलणार आहोत. ते बघून मात्र तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. रस्ते धसणे यात काही नविन नाही. मात्र जमीन आहे त्या जागेवरून वर येणे हे नक्कीच विचित्र वाटू शकते.
पाण्याखाली गेलेल्या एका भागातील रस्ता आपोआप वरती येत असताना दिसत आहे. हा व्हिडीओ बघितल्यावर हा काय प्रकार आहे याबद्दल कुतूहल व्यक्त केले जात आहे. व्हिडीओ घेणारा मनुष्यसुद्धा आजूबाजूच्या लोकांना सतर्क राहून मागे सरकायला सांगत आहे. कारण तेव्हा हा वर येणारा रस्ता किती दूर जाईल याची काही कल्पना नव्हती.
हे कशामुळे झाले याबद्दल अजूनही संभ्रम आहे. काहींच्या मते हे टेक्टोनिक प्लेट्सच्या घडामोडींमुळे घडले आहे. तर दुसरा गट पृथ्वीत अडकलेला मिथेन वायू बाहेर पडल्यामुळे हे घडल्याचे सांगत आहेत. कालपासून मात्र या घटनेची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरात वायरल झाला आहे. लाखो लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला आहे. रोजच्या रोज निसर्गाचे दिसणारे हे रूप बघून मात्र लोकांनी आता पर्यावरणाबद्दल जागरूक होण्याची वेळ आली आहे, असा स्पष्ट संदेश मिळत आहे.