computer

'संवेदन'ची ऑनलाइन जाहिरात लेखन कार्यशाळा...दिग्गजांच्या मार्गदर्शनात शिका जाहिरातीचं तंत्र!!

मंडळी, जाहिरात म्हणजे तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय. आपण दिवसभरात असंख्य जाहिराती बघत असतो. त्यातल्या गाजलेल्या कित्येक लक्षात राहतात आणि कित्येक विसरल्याही जातात. पण लक्षात राहिलेल्या जाहिरातींनी आपल्या मनावर केलेला परिणाम दीर्घकाळ टिकून राहतो. आठवा बरं अश्या कोणत्या जाहिराती आहेत? चला आम्ही काही ओळी देतो आणि तुम्ही ती कोणत्या प्रॉडक्टची जाहिरात होती हे ओळखा… 

'हर एक फ्रेंड जरुरी होता है…'
'हम में है हिरो…' 
'नये भारत की बुलंद तसवीर…' 
'कर्रम कुर्रम कर्रम कुर्रम' 
'प्यार की राह में चलना सीखा' 

काय मंडळी? फक्त या ओळी वाचल्या तरी तुम्हाला त्या कुठल्या प्रॉडक्टच्या जाहिरातीत होत्या ते आठवलं असेल. किंबहुना ती अख्खी जाहिरातच डोळ्यासमोर आली असेल. खरं ना? हीच तर ताकद असते जाहिरातींची! 

आता अशा जाहिराती तयार करणे म्हणजे लै डोकॅलिटीचं काम. एक वेळ तीन तासांचा सिनेमा बनवणं सोपं आहे, पण तीस सेकंदाची जाहिरात बनवून त्यातून योग्य तो संदेश देण्याची कला फार कठीण. म्हणूनच आपल्याकडे जिथे चौसष्ट कला संपतात तिथे जाहिरातीला पासष्टावी कला समजलं जातं. 

जाहिरात तयार करणाऱ्या टीममध्ये अनेकजण असतात. दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, कॅमेरामन, एडिटर, लाईटमन इत्यादी लोक यात सहभागी असतात. पण मंडळी, हा सगळा डोलारा ज्याच्या लिखाणावर उभारलेला असतो तो लेखक जाहिरात तयार होण्याच्या प्रक्रियेमधील सर्वात महत्वाचा भाग आहे. जाहिरात यशस्वी होईल की नाही याची सर्व भिस्त तर लेखकावरच असते! 

तुम्ही टीव्ही किंवा सोशल मीडियावर जाहिराती पाहता, त्यातल्या उत्तम जाहिराती लक्षात ठेवता किंवा स्वतःला म्हणता, "यापेक्षा छान जाहिरात मी लिहिली असती." लिहू शकता ना! सध्या जाहिरात क्षेत्रात लेखकांना प्रचंड मागणी आहे. या संधीचा लाभ कसा घ्यायचा ते आम्ही तुम्हाला सांगू…

जाहिरात क्षेत्रात प्रवेश करायची खरोखर इच्छा असेल तर आजच जॉईन करा… संवेदनची ऑनलाइन जाहिरात लेखन कार्यशाळा! संवेदन ही आजघडीला महाराष्ट्रातील आघाडीची प्रशिक्षण संस्था समजली जाते. संवेदनने अनेक कोर्सेस यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवले आहेत आणि संवेदनचे विद्यार्थी अनेक क्षेत्रात आपले योगदान देऊन चांगले करिअर घडवत आहेत. 

जाहिराती कशा लिहिल्या जात असतील बरं?
जाहिरातीतून अर्थार्जन काय प्रमाणात होतं?

तुम्हाला पडणाऱ्या या आणि अशा अनेक  प्रश्नांना केवळ उत्तरंच नाही, तर या क्षेत्राचे धडे तुमच्याकडून गिरवून घ्यायला येत आहेत अनेक दिग्गज! हे दिग्गज तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन करतीलच, सोबत भरपूर सराव सुद्धा करून घेतील. 

पाहूया, संवेदनच्या ऑनलाइन जाहिरात लेखन कार्यशाळेत तुम्हाला कोण कोण मार्गदर्शन करणार आहे… 

● ज्यांच्या गाण्यांनी, शीर्षक गीतांनी तुम्हाला प्रेमात पाडलं आहे असे श्रीरंग गोडबोले सर. त्यांनी अनेक जिंगल्स आणि टेलिव्हिजन कमर्शिअलसाठी ही लिखाण केलं आहे. 

● अमूल हा ब्रँड ज्यांनी घरा घरात पोहोचवला ते भरत दाभोलकर सर हे जाहिरात क्षेत्रातील अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व, मोदी सरकारचे जाहिरात कॅम्पेनही ज्यांनी यशस्वी केलं, ते आपला अनुभव व येत्या काळात हे क्षेत्र कसं बदलेल हे शिकवायला येत आहेत.

● स्ट्रगलर साला या वेबसिरीजचे लेखन-दिग्दर्शन-निर्मिती या तिन्ही बाजू सांभाळणारे, अनेक सिनेमांचे दिग्दर्शन करणारे आणि असंख्य जाहिरातींची निर्मिती करणारे अनुभवी विजू मानेसर सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करण्यास येत आहेत. 

● अनेक मालिका चित्रपट तर ज्यांनी लिहिल्या त्या आपल्याला आवडल्याच, पण अनेक राजकीय पक्ष आणि त्यांच्या निवडणूक प्रचारा दरम्यानच्या जाहिराती लिहिण्याचा अनेक वर्षाचा अनुभव असलेले विवेक आपटे सर ज्यांनी रेडिओ,वृत्तपात्र, टेलिव्हिजन अशा सर्व माध्यमातून प्रदीर्घ लेखन केले आहे. ते ही ह्यात मार्गदर्शन करतील.

● जेजे व अनेक महाविद्यालय तसेच अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये जाहिरात हा विषय शिकवणारे, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स मधून जाहिरात विश्व ह्या विषयवार सातत्याने लेखन करणारे, एअरटेल, कोलगेट अश्या कित्येक ब्रँडसाठी काम केलेले जाहिरात क्षेत्रातील कान्स सिल्व्हर लायन सारखे अनेक सन्मानाने सन्मानित सौरभ करंदीकर सर ग्राहक मानसशास्त्र आणि जाहिरात हा विषय शिकवणार आहेत.

● जाहिरात लिहिण्यासाठी एक एक शब्द तोलून मापून लिहिला जातो. त्यासाठी भाषेची पकड फार महत्वाची! ती शिकवायला प्राध्यापक विजय तापस सर ही येणार आहेत. ते जाहिरातींचा अनुवाद हा विषयही शिकवतील. विजय तापस सर कॉपी रायटिंग ह्या क्षेत्रात अनेक वर्ष अनेक मोठ्या ब्रँड्ससाठी काम करत आहेत.

● अहमदनगरमधल्या लहानशा गावातून मुंबईत येऊन जाहिरात क्षेत्रात काम करत आज 'एलीक्झर' ह्या जाहिरात कंपनीचे संस्थापक आणि मालक गणेश गडाख सर हे ही येणार आहेत. एलिक्झर ही आज फॉर्च्युन 500 मधील अनेक कंपन्यासाठी जाहिरात निर्मिती करणारी महत्वाची कंपनी मानली जाते. ह्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवोदितां कडून असलेल्या अपेक्षा, काम कसे मिळवावे? ह्या सगळ्या बाबत ते मार्गदर्शन करणार आहेतच, पण ज्यांना स्वतःची जाहिरात कंपनी सुरु करायचं स्वप्न असेल त्यांनाही सर मार्गदर्शन करतील.

तसचं काही सरप्राईज मार्गदर्शक ही असतील बरं का मंडळी! 

सखोल मार्गदर्शन आणि भरपूर सराव करायला लावणारी ही तीन महिन्यांची कार्यशाळा असेल. दर रविवारी सकाळी 10 ते 12 ह्या वेळात तीन महिने ऑनलाइन स्वरूपात होणाऱ्या या कार्यशाळेत मार्गदर्शन, सराव आणि तुमच्या लेखन प्रयत्नांना वाचून त्यावर अभिप्राय ही दिला जाणार आहे. जाहिरात क्षेत्राचं गणित समजून घ्यायला आवडणाऱ्या प्रत्येकासाठी ही कार्यशाळा अतिशय उपयुक्त असून तीन महिन्यांची ही कार्यशाळा पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट ही तुमच्या करियर ग्राफला वेगळी झळाळी देणारं ठरेल.

कार्यशाळा सुरू होतेय 07 जून पासून… आणि फी? फक्त ₹5000! 

अगदी अल्प फीमध्ये बरंच काही शिकायला मिळेल. जर 31 मे पर्यंत प्रवेश घेतला तर फीमध्ये खास दहा टक्के सवलत दिली जाईल. आता वाट कसली बघताय? जाहिरात क्षेत्रात करिअर घडवायचं असेल तर आताच पुढील क्रमांकावर संपर्क साधा - 

+917715830574
+917715901298
+918668336768

 

लेखक : अनुप कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required