व्हिडीओ ऑफ दि डे : कुत्रा vs बिबट्या....कोण जिंकेल ? हा थरारक व्हिडीओ पाहून घ्या भाऊ !!

बिबट्या विरुध्द माणूस किंवा बिबट्या विरुद्ध कुत्रा अशी लढत लावली तर कोण जिंकेल ? बिबट्याच जिंकणार ना राव. पण राजस्थानच्या जयपुर नजीक असलेल्या ‘झलाना सफारी पार्क’मध्ये काही औरच घडलंय. या सफारी पार्क मध्ये एक कुत्रा रस्त्यावर झोपला होता. तेवढ्यात झाडीतून एक बिबट्या आला. त्याला बघताच कुत्रा घाबरला. पण दुसऱ्याच क्षणी त्याने जे केलं ते भल्याभल्यांना जमलं नसतं.
खरं तर त्याने फक्त आपली भुंकण्याची कला वापरली. बिबट्याला बघताच तो भुंकू लागला. आणि एका क्षणाला तर बिबट्या स्वतःच बिथरला. पुढे काय घडलं ते या व्हिडीओ मध्ये बघा !!
कुत्रा घाबरला आहे हे यात साफ दिसतं. घाबरूनही त्याने तिथून पळ काढला नाही तर तो सतत भुंकत राहिला याचं करावं तेवढं कौतुक कमीच.